शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उमदी परिसरामध्ये पावसाने बेदाणा उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 19:20 IST

जत तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसांपासून वाढत्या उन्हामुळे व उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पडलेल्या तुरळक पावसाच्या सरींमुळे थोडा दिलासा मिळाला. सोन्याळ, उटगी, उमदी, सुसलाद, सोनलगीसह परिसरात या सरी कोसळल्या. या पावसाने तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांची चांगलीच झोप उडवली आहे.

ठळक मुद्देउमदी परिसरामध्ये पावसाने बेदाणा उत्पादक हवालदिलतालुक्यातील द्राक्ष बागायतदारांची झोप उडवली

उमदी : जत तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसांपासून वाढत्या उन्हामुळे व उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पडलेल्या तुरळक पावसाच्या सरींमुळे थोडा दिलासा मिळाला. सोन्याळ, उटगी, उमदी, सुसलाद, सोनलगीसह परिसरात या सरी कोसळल्या. या पावसाने तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांची चांगलीच झोप उडवली आहे.सध्या जत पूर्व भागात उटगी, उमदीसह परिसरात ३०० हेक्टरहून जास्त द्राक्षबाग लागवड क्षेत्र आहे. यापैकी ८० टक्के बागांचा माल उतरविण्यात आला असून, तो बेदाण्यासाठी शेडवर पाठवला आहे. या पावसाने हा माल काळा पडणे व कुजण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर २० टक्के बागा उतरविणे बाकी आहे. यांना देखील द्राक्षघड गळून पडणे, मणी फुटून कुजण्याच्या प्रक्रियेची दाट शक्यता आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका या बागायतदारांना बसणार आहे.जत पूर्व भागात द्राक्ष बागयतदार शेतकरी मात्र पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.ंद्राक्षबागेतून द्राक्षे उतरून बेदाणा करण्यासाठी शेडमध्ये टाकली आहेत; पण पाऊस पडल्यानंतर बेदाण्याचे जादा नुकसान होऊ नये म्हणून उमदी परिसरातील शेतकरी ताडपत्रीने पूर्ण शेड झाकण्यासाठी धावपळ करतानाचे चित्र दिसत होते. 

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली