मिरजेत मशिदीत एकत्रित नमाज पठण : ४० जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:33+5:302021-05-09T04:27:33+5:30

लाॅकडाऊन काळात प्रशासनाने कडक नियम लागू करीन धार्मिकस्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता ...

Praying together in Miraj Mosque: Crime against 40 people | मिरजेत मशिदीत एकत्रित नमाज पठण : ४० जणांविरुद्ध गुन्हा

मिरजेत मशिदीत एकत्रित नमाज पठण : ४० जणांविरुद्ध गुन्हा

लाॅकडाऊन काळात प्रशासनाने कडक नियम लागू करीन धार्मिकस्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मिरासाहेब दर्गा मशिदीत दर्गा पंच, खादीम व इतर लाेक एकत्रित नमाज पठण करीत होते. नमाज पठणासाठी जमाव एकत्रित आल्याची माहिती मिळाल्याने पोलीस तेथे पोहोचल्यानंतर २१ जण सापडले. १५ ते २० जणांनी तेथून पलायन केले. याबाबत पोलीस हवालदार संजय पाटील यांनी फिर्याद दिली असून जानीब मेहबूब मुश्रीफ, वसीम मेहबूब मुश्रीफ, शफिक मेहबूब मुश्रीफ, शमशुद्दीन अजिज मुश्रीफ, अब्दुलगफार अजमुद्दीन मुश्रीफ, अजमुद्दीन मुजीब मुश्रीफ, नजीर मेहबूब मुतवल्ली, नजीरअहमद कमालसाहेब मुश्रीफ, अबरार नुरमहमद शरीकमसलत, हन्नान गफुर मुतवल्ली, महंमद कादर मुतवल्ली, इसाक फरीद शरीकमसलत, अय्युब नजीर मुशरीफ, रिजवान रफिक शरीकमसलत, अब्दुल मुजीब अब्दुल अजीज मुलयाशी, अख्तर मुनीर मुश्रीफ, जानीब मेहबूब मुश्रीफ, घुडूलाल इमामुद्दीन मुश्रीफ, सरफराज रसुल मुश्रीफ, इरफान लियाकत शरीकमसलत, नदीम नजीरअहमद मुशरीफ सर्व (रा. मिरज) व इतर १५ से २० अनोळखी अशा ४० जणांविरुद्ध शासन व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास फाैजदार एस. के. कदम करीत आहेत.

Web Title: Praying together in Miraj Mosque: Crime against 40 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.