शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी कोरड्या कालव्यात भजन -- बेडगला धरणे : पाणी न सोडल्याचा आंदोलनचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:02 IST

मिरज : म्हैसाळ योजनेचे थकीत बिल टंचाई निधीतून भरुन पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीदीच्या कार्यकर्त्यांनी बेडग (ता. मिरज) येथील हुलेगिरी फाट्यावरील टप्पा क्रमांक तीनच्या

ठळक मुद्देमिरज पूर्व भागात पाणी टंचाईने शेतातील पिके धोक्यात आली पाणी न सोडल्यास आंदोलन तीव्र करू, प्रसंगी मंत्र्यांना फिरकू न देण्याचा इशाराअन्य शेतकरी सहभागी झाल्यानंतर भजन म्हणत कोरड्या कालव्यामध्ये आंदोलनकर्ते उतरले

मिरज : म्हैसाळ योजनेचे थकीत बिल टंचाई निधीतून भरुन पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीदीच्या कार्यकर्त्यांनी बेडग (ता. मिरज) येथील हुलेगिरी फाट्यावरील टप्पा क्रमांक तीनच्या कोरड्या कालव्यामध्ये भजन आंदोलन केले. भर उन्हात सुमारे दोन तास आंदोलन सुरू होते. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ पाणी न सोडल्यास आंदोलन तीव्र करू, प्रसंगी मंत्र्यांना फिरकू न देण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

मिरज पूर्व भागात पाणी टंचाईने शेतातील पिके धोक्यात आली आहेत. पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता असल्याने प्रशासनाने योजनेचे थकीत बिल टंचाई निधीतून भरुन म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात यावे, या मागणीचे निवेदन काँग्रेस व राष्टÑवादीतर्फे तहसीलदारांना दिले होते. दहा दिवसात पाणी न सोडल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता. मुदतीत पाणी सोडण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कार्यकर्त्यांसह शेतकºयांनी बेडग येथील हुलेगिरी फाट्यावरलील टप्पा क्रमांक तीनच्या कोरड्या कालव्यामध्ये बसून भजन आंदोलन कले. अकराच्या सुमारास पंप हाऊसच्या आवारात शेतकºयांनी भजनाला सुरुवात केली. अन्य शेतकरी सहभागी झाल्यानंतर भजन म्हणत कोरड्या कालव्यामध्ये आंदोलनकर्ते उतरले. तेथे भर उन्हात ठिय्या मारून भजन सुरू केले.

सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. यावेळी सलगरचे सरपंच तानाजी पाटील म्हणालेकी, सध्या पिण्याच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न गंभीर बनत असल्याने म्हैसाळ योजना कार्यान्वित करावी, अशी निवेदनाव्दारे तहसीलदारांकडे मागणी केली होती. योजना सुरू करण्यासाठी दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आंदोलनाचा पाहिला टप्पा म्हणून भजन आंदोलन करण्यात आले. राज्य शासन बँक, देवस्थानांना हजारो कोटींचा निधी देते. उद्योगपतींचे कर्ज, व्याज माफ करते, मात्र म्हैसाळ योजनेचे ५ कोटींचे थकीत वीजबिल भरून म्हैसाळ योजना सुरू करीत नाही. शासनाने टंचाई निधीतून वीज बिल भरून योजना सुरू होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार आहे. माजी सभापती अनिल आमटवणे, खंडेराव जगताप, वसंतराव गायकवाड, तानाजी पाटील, माजी सभापती दिलीप बुरसे, बाळासाहेब होनमोरे, सिध्दार्थ जाधव, अण्णासाहेब कोरे, बाळासाहेब नलवडे, सुरेश कोळेकर सहभागी होते. 

मंत्र्यांना फिरकू देणार नाहीआमदार सुरेश खाडे हे टंचाईतून पाच कोटींचा निधी मंजूर असल्याने योजना लवकरच सुरू होणार असल्याचे ते सांगत असले तरी,ती नेमकी कधी सुरू होणार, हे मात्र ते सांगत नाहीत. आ. खाडे हे खोटे बोलून शेतकºयांची दिशाभूल करीत आहेत. भाजपचे सरकार असल्याने त्यांनी म्हैसाळ योजनेचा थकीत बिलाचा प्रश्न निकालात काढून योजना सुरू करावी, शेतकºयांच्यावतीने आम्ही त्यांचा चांदीचा गदा देऊन सत्कार करू, योजना सुरू करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाल्यास भाजपच्या मंत्र्यांना भागात फिरकू देणार नसल्याचा इशारा माजी सभापती अनिल आमटवणे व सलगरेचे सरपंच तानाजी पाटील यांनी दिला.

टॅग्स :DamधरणSangliसांगली