अजय निकमकडून प्रवीण थोरात चितपट
By Admin | Updated: April 22, 2015 00:30 IST2015-04-21T22:45:06+5:302015-04-22T00:30:03+5:30
मारूल हवेली कुस्ती मैदान : हरेल थोरात व सचिन कदमची लढत बरोबरीत

अजय निकमकडून प्रवीण थोरात चितपट
पाटण : मारूल हवेली, ता. पाटण येथे आयोजीत कुस्ती मैदानात इस्लामपूरच्या राजारामबापू कुस्ती केंद्राचा पै. अजय निकम व कोल्हापुरच्या न्यू मोतिबाग तालमीचा पै. प्रविण थोरात यांच्यात प्रथम क्रमांकाची लढत झाली. तब्बल १० मिनिटे चाललेल्या या कुस्तीमध्ये अजय निकम याने दुहेरी पटामध्ये प्रविण थोरातला चितपट केले. मारूल हवेली गावचे कुलदैवत असणाऱ्या निनाईदेवीची वार्षिक यात्रा उत्साहात साजरी झाली. यावेळी कुस्तीच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १० रूपयांपासुन ते ५१ हजार रूपयांपर्यंतच्या निकाली कुस्त्या झाल्या. राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेश सचिव सारंग पाटील, सरपंच उत्तम नांगरे, सरपंच नितीन शिंदे, चंद्रकांत पाटील, अॅड. डि. पी. जाधव, मुलाणी, प्रकाश जाधव, गणपतराव शिंदे यांच्या उपस्थितीत आखाड्यास सुरूवात झाली. हरेल थोरात आणि सचिन कदम यांच्या मधील कुस्ती बरोबरीत सुटली. अन्य लढतीत किरण चोरगे, सुरज पाटील, तुषार कदम यांनी विजय मिळवला. पंच म्हणून पै. दादासाहेब पाटील, मोहनराव पाटील, राजू माने, हिंदूराव शिंदे, मोहन नांगरे यांनी काम पाहिले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कुस्त्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. समालोचन ईश्वरा पाटील यांनी केले. मैदानाचे नियोजन चंद्रकांत पाटील, नितीन शिंदे, संजय नांगरे, प्रकाश जाधव, मारूती जाधव, विश्वास हिंदुळे, मोहनराव कदम, सुरेश पाटील, संभाजी कृष्णा पाटील, विश्वास कोळेकर, विजयराव मोरे, दामोदर हिरवे, प्रमोद मस्के, जालिंदर भालेराव, सुनिल कांबळे, बजरंग धुमाळ, अधिक चव्हाण, किरण जाधव, वसंतराव जाधव, पांडुरंग शिंदे यांनी केले. (प्रतिनिधी)