शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

हवालदाराच्या मुलीनं उचलली चांदीची गदा; सांगलीची लेक ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 19:51 IST

सांगलीची प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे.

women maharashtra kesari । सांगली : सांगली येथे पार पडलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजयाचा मान प्रतीक्षा बागडी हिला मिळाला आहे. कल्याणच्या वैष्णवी पाटील हिला अस्मान दाखवून प्रतीक्षाने चांदीची गदा उंचावली. खरं तर महाराष्ट्र केसरीची मानकरी ठरलेली प्रतीक्षा ही एका पोलीस हवालदाराची मुलगी आहे. 

पुरूष महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या धर्तीवर यंदा प्रथमच महिला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आयोजित करण्यात आली. पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सांगलीत ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित या स्पर्धेच्या विजयाचा मान सांगलीच्या लेकीने पटकावला. 23 आणि 24 मार्च या दोन दिवशी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची अंतिम लढत सांगलीची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील यांच्यात पार पडली. एकेकाळी एकाच रूममध्ये राहणाऱ्या दोन पैलवानांमध्ये अंतिम सामना झाला. दोन मैत्रिणींमधील लढत पाहण्यासाठी कुस्ती चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. अखेर सांगलीच्या प्रतीक्षाने 'प्रतीक्षा' संपवत कल्याणच्या वैष्णवी पाटीलला अस्मान दाखवून महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला. 

प्रतीक्षा बागडीनं रचला इतिहासपहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचा मान पटकावणारी प्रतीक्षा बागडी ही मूळची सांगलीच्या तुंग गावची आहे. प्रतीक्षा ही 21 वर्षांची असून ती वसंत कुस्ती केंद्र सांगली इथे सराव करते. लक्षणीय बाब म्हणजे राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने पदके पटकावली आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणाऱ्या प्रतीक्षाने खेलो इंडियामध्ये रौप्य पदक जिंकले होते. याशिवाय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ गटात देखील रौप्य पदक जिंकले होते. 

 

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाWomenमहिलाSangliसांगलीWrestlingकुस्ती