आष्ट्याच्या उपनगराध्यक्षपदी प्रतिभा पेटारे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:28+5:302021-02-09T04:29:28+5:30
आष्टा : आष्टा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रतिभा जनार्दन पेटारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगराध्यक्ष ...

आष्ट्याच्या उपनगराध्यक्षपदी प्रतिभा पेटारे बिनविरोध
आष्टा : आष्टा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रतिभा जनार्दन पेटारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगराध्यक्ष स्नेहा माळी यांनी काम पाहिले. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली.
यावेळी आष्टा शहर विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे, वैभव शिंदे, वाळवा पंचायत समिती माजी उपसभापती भाग्यश्री शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य झुंजारराव पाटील, पक्षप्रतोद विशाल शिंदे, धैर्यशील शिंदे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, म्हाडाचे अधिकारी विजय पेटारे, विजय मोरे उपस्थित होते.
आष्टा पालिकेत माजी आमदार विलासराव शिंदे व जलसंपदामंत्री जयंत पाटील गटाची सत्ता आहे. दुसऱ्या व चौथ्या वर्षी जयंत पाटील गटाला उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्यात येते. उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर प्रतिभा पेटारे यांची निवड करण्यात आली.
प्रतिभा पेटारे म्हणाल्या, माजी आमदार विलासराव शिंदे यांनी नगरसेवक पदाची संधी दिली. कोरोना संकटासह विविध सामाजिक कार्यात दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण केली. सत्ताधारी गटाने दाखवलेला विश्वास निश्चित सार्थ ठरविणार.
फोटो-०८आष्टा३
फोटो : आष्टा पालिकेच्या नूतन उपनगराध्यक्ष प्रतिभा पेटारे यांचा वैभव शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी भाग्यश्री शिंदे, झुंजारराव शिंदे, झुंजारराव पाटील, विशाल शिंदे, शैलेश सावंत, स्नेहा माळी, धैर्यशील शिंदे, विजय मोरे, विजय पेटारे, सतीश माळी आदी उपस्थित होते.