पलूसच्या उपनगराध्यक्षपदी प्रतिभा डाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:34+5:302021-09-14T04:31:34+5:30
पलूस : पलूसच्या उपनगराध्यक्षपदी प्रतिभा मिलिंद डाके यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सुनीता कांबळे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त ...

पलूसच्या उपनगराध्यक्षपदी प्रतिभा डाके
पलूस : पलूसच्या उपनगराध्यक्षपदी प्रतिभा मिलिंद डाके यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सुनीता कांबळे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर ही निवड झाली.
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, महेंद्र लाड, खाशाबा दळवी, वैभव पुदाले यांचे मार्गदर्शनाखाली ही निवड झाली. नगर परिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी गणेश मरकड यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया घेण्यात आली.
उपनगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा डाके यांचा एकच अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड झाली. प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी काम पाहिले. नगराध्यक्ष परशुराम शिंदे, गटनेते सुहास पुदाले, संदीप सिसाळ, ऋषिकेश जाधव, रेखा भोरे, प्रकाश पाटील, अमोल भोरे, प्रताप गोंदील, मिलिंद डाके, कुमार माळी, प्रकाश डाके उपस्थित होते.
130921\img_7344.jpg
पलूस उपनगराध्यक्ष निवड