आळसंदमधील कोविड सेंटरला प्रतीक पाटील यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:38+5:302021-06-03T04:19:38+5:30
आळसंद : आळसंद (ता. खानापूर) येथील छत्रपती शिवाजीराजे कोविड केअर सेंटर व ग्रामपंचायतीच्या विलगीकरण कक्षास भेट देवून प्रतिक पाटील ...

आळसंदमधील कोविड सेंटरला प्रतीक पाटील यांची भेट
आळसंद : आळसंद (ता. खानापूर) येथील छत्रपती शिवाजीराजे कोविड केअर सेंटर व ग्रामपंचायतीच्या विलगीकरण कक्षास भेट देवून प्रतिक पाटील यांनी लसीकरण केंद्राची पाहणी केली.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड्. बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, खानापूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुशांत देवकर, सरपंच इंदूमती जाधव, नितीनराजे जाधव उपस्थित होते.
युवानेते प्रतीक पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी कोरोना प्रतिबंधासाठी योगदान देत असलेल्या सरपंच, आरोग्य कर्मचारी, आशासेविका, दक्षता समिती यांचा प्रतीक पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. कोरोनाला रोखण्यासाठी गावामध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.
यावेळी वाझरचे मधुकर सुर्यवंशी, पोलीस पाटील गणेश शेटे, राष्ट्रवादी सेलचे अजित जाधव, डॉ.संग्राम जाधव, डाॅ.हिम्मत पाटील, मनोहर चव्हाण, अण्णासो जाधव, भरत हारुगडे, खंडेराव जाधव, दौलत जाधव, भरत जाधव, कैलास जाधव, श्रीरंग शिरतोडे, अशोक जाधव उपस्थित होते.