नगरपालिकेचे नेतृत्व प्रतीक पाटीलच पाहणार;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:17+5:302020-12-09T04:22:17+5:30

इस्लामपूर : माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या निधनानंतर इस्लामपूर शहरातील राष्ट्रवादीकडे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपले पुत्र प्रतीक पाटील ...

Prateek Patil will lead the municipality; | नगरपालिकेचे नेतृत्व प्रतीक पाटीलच पाहणार;

नगरपालिकेचे नेतृत्व प्रतीक पाटीलच पाहणार;

इस्लामपूर : माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या निधनानंतर इस्लामपूर शहरातील राष्ट्रवादीकडे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपले पुत्र प्रतीक पाटील यांच्याकडे सोपविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. शहरातील प्रभागांच्या सर्व बैठका पाटील यांनी त्यांना सोबत घेऊनच केल्या आहेत. चिमण डांगे यांच्याकडे नेतृत्व जाण्याची शक्यता धूसर झाली आहे.

जयंत पाटील यांनी ज्येष्ठ नगरसेवक संजय कोरे यांच्यावर गटनेत्याची जबाबदारी दिली. परंतु कोरे यांना निर्णय घेण्यात अनेक अडथळे येत आहेत. कोरे यांनी या पदाकडे दुर्लक्षच केले आहे. शहाजी पाटील, खंडेराव जाधव यांनाही नेतेपदाची ओढ लागली आहे. परंतु जयंत पाटील यांच्या अनुपस्थितीत निर्णय घेणाऱ्या नेत्याची राष्ट्रवादीला गरज आहे. तीस वर्षे पाटील गटाचे नगरसेवक जयंत पाटील यांच्या ताकदीवर तरले आहेत. नगरपालिका सभागृहात राष्ट्रवादीची ताकद असतानाही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेल्या चार वर्षात कोणीही आवाज उठवलेला नाही. आता जयंत पाटील यांनी शहराची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. गेल्या दोन दिवसात बुथनिहाय बैठका घेऊन समस्या ऐकल्या आहेत. या प्रत्येक बैठकीत त्यांचे पुत्र प्रतीक पाटील उपस्थित होते. त्यातून शहरातील राजकारणाची सूत्रे प्रतीक पाटील यांच्याकडे जाण्याचे संकेत मिळत आहेत.

कोट

गेल्या दोन वर्षांपासून मतदारसंघातील प्रत्येक बुथ कमिटीच्या बैठकीला माझी उपस्थिती आहे. याचे नियोजन राष्ट्रवादीचे पदाधिकारी करतात. बैठकीत फक्त जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचेच मार्गदर्शन असते. माझी फक्त उपस्थिती असते. भविष्यातील राजकारणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

- प्रतीक जयंत पाटील, युवा नेते

फोटो -०८१२२०२०-आयएसएलएम-प्रतिक पाटील

Web Title: Prateek Patil will lead the municipality;