शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: राजारामबापू कारखान्याची सूत्रे तिसऱ्या पिढीकडे, अध्यक्षपदी प्रतीक पाटील विराजमान

By श्रीनिवास नागे | Updated: February 17, 2023 14:01 IST

आजोबांनी स्थापन केलेल्या कारखान्याची सूत्रे नातवाकडे

युनूस शेखइस्लामपूर : सहकार क्षेत्रात एका कारखान्याची दुसरी शाखा स्थापन करण्याच्या देशातील पहिल्या विक्रमाची नोंद करणाऱ्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.

वयाच्या ३२ व्या वर्षी प्रतीक यांनी आपले आजोबा राजारामबापू पाटील यांनी १९६८ साली स्थापन केलेल्या या साखर कारखानदारीची धुरा अंगावर घेतली आहे. या निवडीने जयंत पाटील यांच्या राजकारणातील वारस प्रतीक हेच असतील यावर शिक्कामोर्तब झाले. उपाध्यक्षपदी विजयराव पाटील यांना कायम ठेवण्यात आले.येथील कारखाना कार्यस्थळावरील सभागृहात जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या अध्यखातेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष बैठक झाली.सहायक अधिकारी म्हणून  तालुका निबंधक रंजना बारहाते यांनी काम पाहिले.या बैठकीत प्रतीक पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी कार्तिक पाटील यांनी सूचना तर रघुनाथ जाधव यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी विजयराव पाटील यांना देवराज पाटील आणि बाळासाहेब पवार यांनी सूचना व अनुमोदन दिले.

विहित वेळेत दोन्ही पदासाठी एकच अर्ज आल्याने त्याची छाननी आणि माघारीची मुदत संपल्यानंतर सुरवसे यांनी अध्यक्षपदी प्रतीक जयंत पाटील आणि उपाध्यक्ष म्हणून विजयराव बळवंतराव पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले.निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी सर्व संचालकांसोबत राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आशिर्वाद घेतले. तर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेJayant Patilजयंत पाटील