जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:20 IST2021-01-10T04:20:09+5:302021-01-10T04:20:09+5:30

इस्लामपूर : सांगली जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी युवा नेते प्रतीक जयंत पाटील यांची तर सचिवपदी प्रा. डॉ. संदीप शामराव ...

Prateek Patil as the President of District Volleyball Association | जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटील

जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटील

इस्लामपूर : सांगली जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी युवा नेते प्रतीक जयंत पाटील यांची तर सचिवपदी प्रा. डॉ. संदीप शामराव पाटील यांची निवड झाली. बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर संघटनेची सूत्रे युवा पिढीच्या हाती आली आहेत.

येथे जिल्हा संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्येष्ठ खेळाडू महंमदसाब मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मावळते सचिव प्रा. एम. एस. सूर्यवंशी, संस्थापक सदस्य विलासराव जाधव, विश्वासराव पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते कबड्डी प्रशिक्षक पोपट पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या व्हॉलिबॉल खेळाडू सुजाता नवले-कल्याणी यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेत सर्व ठराव मंजूर करण्यात आले. अध्यक्ष सुधीर पिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली. राष्ट्रीय खेळाडू व पंच राजेंद्र सातपुते यांनी अध्यक्षपदासाठी पाटील यांचे नाव सुचविले. त्याला संपतराव पाटील यांनी अनुमोदन दिले. पोपट पाटील यांनी सचिवपदासाठी संदीप पाटील यांचे नाव सुचवले, त्याला शंकरराव पाटील यांनी अनुमोदन दिले.

जिल्हा कार्यकारिणी निवडण्याचे अधिकार नूतन अध्यक्ष प्रतीक पाटील, सचिव संदीप पाटील, प्रा. सुजाता नवले-कल्याणी यांना देण्यात आले. पोपट पाटील, प्राचार्य संजय ढोबळे-पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन क्रीडाधिकारी जमीर अत्तार यांनी केले तर मोहन पाटील यांनी आभार मानले.

यावेळी प्रकाश पाटील, अमोल पिसे, विश्वास साळुंखे, राजन पिसे, मामा इटकरकर, सुभाष सूर्यवंशी, उद्योजक रणजित पाटील, एम. जी. पाटील, मानसिंग पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, संतोष चिमाण्णा उपस्थित होते.

फोटो-

सांगली जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रतीक पाटील यांचा महंमदसाब मुल्ला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Prateek Patil as the President of District Volleyball Association