शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळला राष्ट्रवादीकडून प्रताप पाटील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 17:59 IST

संजय पाटील, अजितराव घोरपडेंच्या भूमिकेची उत्सुकता

दत्ता पाटीलतासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी अंतिम आहे. तर महायुतीकडून जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्यास, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ. प्रताप पाटील यांची उमेदवारी अंतिम होण्याची शक्यता आहे. माजी खासदार संजय पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या भूमिकेची ही मतदारसंघात उत्सुकता आहे.लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसल्यानंतर, विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ झाली. मागील निवडणुकीत विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांच्या विरोधात माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र पाच वर्षात अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. विशेषता लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील यांचा पराभवाने तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी कवठेमहांकाळ येथे झालेल्या कार्यक्रमात दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच तसे संकेत दिले आहेत. मात्र रोहित पाटील यांच्या विरोधात कोण? हे चित्र अद्याप निश्चित नाही. महायुतीच्या जागा वाटपातील सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे, त्याच पक्षाकडे तो मतदारसंघ राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे राहील, अशी शक्यता आहे. जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रताप पाटील यांचे उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधामुळे त्यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने अजितराव घोरपडे यांच्या उपस्थितीमुळे या चर्चेला आणखीनच वेग आला आहे.लोकसभा निवडणुकीत अजितराव घोरपडे यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना रसद दिली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला घोरपडेंची भूमिका निर्णायक ठरणारी आहे. तर लोकसभेच्या पराभवानंतर माजी खासदार संजय पाटील स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की पुत्र प्रभाकर पाटील यांना रिंगणात उतरवणार? याबाबतचे नेमके चित्र स्पष्ट नाही. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

अजितराव घोरपडे यांची उपस्थिती लक्षवेधी..शिरगाव येथे डॉ. प्रताप पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी झालेल्या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री घोरपडे यांनी आवर्जून उपस्थिती लावली. त्यांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात घोरपडे गटाचा प्रभाव आहे. विधानसभा निवडणुकीत घोरपडेंची भूमिका किंगमेकरची ठरणार आहे. त्यांनी विधानसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असणाऱ्या डॉ. पाटील यांच्या वाढदिवसाला हजेरी लावल्यामुळे उमेदवारीची पारडे जड मानले जात आहे.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Rohit Patilरोहित पाटिलNCPराष्ट्रवादी काँग्रेस