रेठरे धरणावर विनाकारण फिरणाऱ्यांना लाठीचा प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:26 IST2021-05-14T04:26:20+5:302021-05-14T04:26:20+5:30
रेठरे धरण येथे गेले दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णात पिंगळे यांनी रेठरे धरण येथील अमर चौक, ...

रेठरे धरणावर विनाकारण फिरणाऱ्यांना लाठीचा प्रसाद
रेठरे धरण येथे गेले दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णात पिंगळे यांनी रेठरे धरण येथील अमर चौक, झेंडा चौक येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली. यामुळे रस्त्यावरील गर्दी एकदम कमी झाली. आपत्ती व्यवस्थापन कमिटीने मास्क नसणाऱ्या व बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी असे कृष्णात पिंगळे यांनी आदेश दिले. यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील, महादेव पाटील, पोलीस पाटील उमेश बनसोडे, तलाठी दीपाली थोरबोले आदी उपस्थित होते.
चाैकट
प्रशासन सतर्क
सुमारे सात ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या रेठरे धरण येथे आज अखेर १५३ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या ७२ रुग्ण आहेत. त्यांच्यावर घरीच; तर चार रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावात आतापर्यंत एकूण ७०० हूनअधिक नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. बुधवारी एकदम २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे गावात प्रशासन सतर्क झाले आहे.