प्रांजली अर्बन बँकेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:52+5:302021-09-19T04:27:52+5:30

इस्लामपूर : आर्थिक संस्था सुरू करणे सोपे असते,मात्र त्या चालविणे अवघड असते. सलग दोन वर्षातील कोरोना आणि महापूर यामुळे ...

Pranjali Urban Bank acquired the trust of the customers | प्रांजली अर्बन बँकेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला

प्रांजली अर्बन बँकेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला

इस्लामपूर : आर्थिक संस्था सुरू करणे सोपे असते,मात्र त्या चालविणे अवघड असते. सलग दोन वर्षातील कोरोना आणि महापूर यामुळे सर्व स्तरातील नागरिकांचे अर्थकारण कोलमडले आहे. मात्र अशा परिस्थितीत प्रांजली अर्बन निधी बँकेने अल्पावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन करून बँकिंग क्षेत्रात आपली वेगळी निर्माण केली आहे असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी व्यक्त केले.

नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष, निशिकांत भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील प्रांजली अर्बन निधी बँकेस कोरे यांनी सदिच्छा भेट दिली.

कोरे म्हणाल्या, प्रकाश शिक्षण आरोग्य व उद्योग समूह हा सांगली जिल्ह्याच्या विकासात भर घालणारा, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावणारा, गरीब व गरजू रूग्णांना चांगली सेवा देणारा, सुशिक्षित बेरोजगार तरूणांच्या हाताला काम देणारा आहे. निशिकांत पाटील यांनी उभा केलेल्या संस्था या सर्वसामान्यांचा विकास साधणारा आहेत.

बँकेचे अध्यक्ष संदीप सावंत यांनी कामाची माहिती दिली. यावेळी तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे, बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थिती होते.

फोटो- इस्लामपूर येथे प्रांजली अर्बन बँकेत जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचा सत्कार संदीप सावंत यांनी केला. यावेळी धैर्यशील मोरे उपस्थित होते.

Web Title: Pranjali Urban Bank acquired the trust of the customers