प्रकाश हॉस्पिटलमधील चौघांना अंतरिम जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:21 IST2021-06-05T04:21:10+5:302021-06-05T04:21:10+5:30

इस्लामपूर : येथील प्रकाश हॉस्पिटलमधील चौघांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांनी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर ...

Prakash Hospital granted interim bail to four | प्रकाश हॉस्पिटलमधील चौघांना अंतरिम जामीन मंजूर

प्रकाश हॉस्पिटलमधील चौघांना अंतरिम जामीन मंजूर

इस्लामपूर : येथील प्रकाश हॉस्पिटलमधील चौघांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांनी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला. यावर १८ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे चौघांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

इंद्रजित दिलीप पाटील, डॉ. अभिमन्यू शिवाजीराव पाटील, विश्वजित सुरेश पाटील आणि प्रवीण बाळासाहेब माने अशी या चौघांची नावे आहेत. उच्च न्यायालयात ॲड्. सायली धुरू यांनी चौघांच्यावतीने युक्तिवाद केला. या सर्वांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद आहे.

येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने वरील सर्वांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने, पोलीस बोलावतील त्यावेळी त्यांच्यासमोर हजर राहून सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Prakash Hospital granted interim bail to four