जत तालुका तालीम संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:31 IST2021-09-07T04:31:19+5:302021-09-07T04:31:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जत : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास उर्फ प्रकाश भोसले यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे जत तालुका ...

Prakash Bhosle as the President of Jat Taluka Talim Sangh | जत तालुका तालीम संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश भोसले

जत तालुका तालीम संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश भोसले

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास उर्फ प्रकाश भोसले यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे जत तालुका कुस्ती तालीम संघाच्या अध्यक्ष्यस्थानी निवड करण्यात आली आहे.

तरुण पिढीला कुस्तीचा छंद लागावा. तरुण पिढी सदृढ व निरोगी राहावी, या उद्धेशाने भोसले यांनी कुस्ती निवेदक कृष्णा शेंडगे यांना प्रोत्साहन दिले. कुस्ती निवेदक कृष्णा शेंडगे यांनी या प्रोत्साहनाच्या बळावर मौजे कुंभारी येथे श्रीनिवास भोसले कुस्ती प्रशिक्षण केंद्राची स्थापना करून तालुक्यातील तरुणांना प्रशिक्षित केले. हळूहळू या कुस्ती केंद्राचे वटवृक्षात रूपांतर झाले. कुंभारी येथे श्रीनिवास भोसले कुस्ती प्रशिक्षण केंद्राची सुसज्ज इमारत असून, अनेक पैलवान निर्माण करण्याचे काम शेंडगे यांनी केले. श्रीनिवास भोसले यांच्या प्रामाणिक हेतूचा गौरव करत भोसले यांची जत तालुका कुस्ती तालीम संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे शेंडगे यांनी सांगितले.

060921\img-20210906-wa0024.jpg

श्रीनिवास उर्फ प्रकाश रामचंद्र भोसले यांची जत तालुका तालीम संघाच्या अध्यक्षपदी निवड

Web Title: Prakash Bhosle as the President of Jat Taluka Talim Sangh