प्रकाश आडमुठे यांचा ‘कोरोना योद्धा’ पुरस्कार देऊन गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST2021-01-19T04:27:32+5:302021-01-19T04:27:32+5:30
आष्टा : येथील धन्वंतरी डॉ. प्रकाश आडमुठे यांनी कोरोना संकटकाळात आष्टा शहर व परिसरातील रुग्णांची अविरत सेवा केली. याबद्दल ...

प्रकाश आडमुठे यांचा ‘कोरोना योद्धा’ पुरस्कार देऊन गौरव
आष्टा : येथील धन्वंतरी डॉ. प्रकाश आडमुठे यांनी कोरोना संकटकाळात आष्टा शहर व परिसरातील रुग्णांची अविरत सेवा केली. याबद्दल श्री चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ‘कोरोना योद्धा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तानाजी टकले, सुरेंद्र शिराळकर, सुजित शिंदे, अमर शिंदे, उदयसिंह देशमुख, अनिल शेजाळे यांचाही सन्मान करण्यात आला.
श्री ट्रस्टचे संस्थापक प्रदीप पाटील, अभिनंदन पाटील, सचिन दमामे, डी. बी. पाटील यांच्याहस्ते डॉ. प्रकाश आडमुठे यांचा गौरव करण्यात आला.
अभिनंदन पाटील म्हणाले, डॉ. प्रकाश आडमुठे यांनी महापुरासह, कोरोना संकटात गोरगरीब जनतेला अल्पदरात सेवा करीत मानवता धर्म जपला आहे. त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहे.
यावेळी कुबेर पाटील, राहुल आवटी, संजय लोखंडे, मनोज मासाळ, बाळासाहेब कुलकर्णी, अमोल तांबवेकर, दीपक आवटी, प्रमोद कवठेकर, दिलीप कोरे, अमिर फकीर, अरविंद कवठेकर उपस्थित होते. विश्वजित सांभारे यांनी आभार मानले.
फोटो : १८०१२०२१-आयएसएलएम-आष्टा प्रकाश आडमुठे सत्कार न्यूज
श्री चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने डॉ. प्रकाश आडमुठे यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रदीप पाटील, डी. बी. पाटील, अनिल शेजाळे उपस्थित होते.