प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे सांगलीत पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST2021-08-15T04:26:53+5:302021-08-15T04:26:53+5:30
सांगली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सांगली शहर आणि ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या ...

प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे सांगलीत पूरग्रस्तांना मदत
सांगली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सांगली शहर आणि ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
पहिल्या दिवशी शहरातील केंगार गल्ली, सांगलीवाडी, अंकली फाटा येथे किट वाटप करण्यात आले. हंडोरे म्हणाले, प्रत्येक आपत्तीवेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पूरग्रस्तांच्या मदतीला धावली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात आवश्यक ती मदत पुरवण्यात आली. पुराच्या काळात कार्यकर्त्यांनी खूप चांगले मदतकार्य केले आहे.
यावेळी प्रा. नेमिनाथ बिरनाळे, सिद्धार्थ माने, विजय आवळे, शुभम बनसोडे, सिद्धार्थ कुदळे, सनी धोतरे, शशिकांत बनसोडे, एन. के. कांबळे, सदाशिव खाडे, सचिन घेवारे, अल्ताफ पेंढारी, राजेंद्र कांबळे, प्रशांत ऐवळे, आशिष चौधरी, नंदाताई कोलप उपस्थित होते.