सांगली : महावितरणच्या अतिशय तातडीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी सांगली विभागातील सांगली शहरासह मिरज, कडेगाव, तासगाव आणि जत तालुक्यांतील काही भागांतील ग्राहकांचा वीजपुरवठा मंगळवार, दि. ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नऊ तास खंडित करण्यात येणार आहे. ‘महावितरण’चे दुरुस्तीचे काम शहरात टप्प्या-टप्प्याने पूर्ण होणार आहे, अशी माहिती महावितरणकडून सांगण्यात आली.महावितरणने अतिशय तातडीच्या दुरुस्तीसाठी २१ फिडर मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत; पण त्यापूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यास वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
या भागातील वीज बंद३३ केव्ही कडेगाव : कडेगाव, नेरला, अपशिंगी, कोठवडे, खंबाळे, व्यापूर, शिवाजीनगर, निमसूद, रेणूशिवाडी. मिरज तालुक्यातील ३३ केव्ही सह्याद्री, कुपवाड, महाबळ, तुलसी सनराइस.मिरज तालुक्यातील : ३३ केव्ही दरीकोनूर - दरीकोनूर, वळसंग, सिद्धनाथ, शेडयाळ, सोर्डी, दरीबडची, मुचंडी. ३३ केव्ही लवंगा- लवंगा, को-बोबलाद, मोटेवाडी, मोरबगी, जिरग्याळ, जाल्याळ. ३३ केव्ही बोर्गी- करसगी, बोर्गी, दवंडगी, बाळगाव, अक्कलवाडी, माणिकनळ, गिरगाव, लवंगा, भिवर्गी. ३३ केव्ही संख- संख, भिवर्गी, अंकलगी, असंगी व परिसर.तासगाव तालुक्यातील : ३३ केव्ही बोरगाव- बोरगाव, पानमळेवाडी, शिरगाव. मिरज तालुक्यातील : ३३ केव्ही महाबळ, ३३ केव्ही सुयश ऑटोमोबाइल्स आणि ३३ केव्ही वेस्टर्न प्रेसिकस्त फॅक्टरी. सांगली शहर, मिरज मार्केट, किल्लाभाग, दर्गाह परिसर, ब्राह्मणपुरी, शिवाजी रोड, पोलिस स्टेशन, शास्त्री चौक, चांद कॉलनी, मिरज फिल्टर हाऊस, शनिवार पेठ.सांगलीतील ११ केव्ही वाहिन्या : ११ केव्ही कॉटनमिल- संजय इंडस्ट्रियल इस्टेट, माधवनगर. ११ केव्ही गव्हर्मेंट कॉलनी- गव्हर्मेंट कॉलनी, कुंभार मळा, हसणीआश्रम, स्फूर्ती चौक, ११ केव्ही इंडस्ट्रियल- बापटमळा, विकास चौक, बिरणाळे कॉलेज. ११ केव्ही दत्तनगर, एमएसईबी कॉलनी, सहयोगनगर. ११ केव्ही धामनी.वाळवा तालुक्यातील : ३३ केव्ही इस्लामपूर एमआयडीसी - कापूसखेड, साखराळे, दूध संघ.
वीजपुरवठा देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी दि. ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वेळेनुसार दिलेल्या वेळेपूर्वी किंवा नंतर पूर्ववत होऊ शकतो. याची सर्व संबंधित ग्राहकांनी नोंद घेऊन विद्युत वितरण कंपनीस सहकार्य करावे. -धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता, महावितरण