वाळवा : नागठाणे (ता. पलूस) येथील विविध विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विरोधी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख गटाच्या पॅनेलचा धुव्वा उडवत १३ जागांपैकी १२ जागांवर मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळविला.विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागठाणे (ता. पलूस) येथील माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, माजी सरपंच एकनाथ झेंडे, पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, राजाराम मदने (विद्यमान संचालक), आनंदराव जगदाळे व कार्यकर्ते यांनी, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे नेतृत्व स्वीकारुन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी विरोधी गटाचे अस्तित्व संपुष्टात आले होते. त्याचा परिणाम म्हणून सतत ६ ते ७ संचालक असणाऱ्या गटाला या निवडणुकीत फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले.काँग्रेसप्रणित पॅनेलचे नेतृत्व पलूस पंचायत समितीचे माजी उपसभापती जयकर पाटील, माजी सरपंच राजेंद्र पाटील, दिलीप कुलकर्णी, गणपती पाटील, शंकर जाधव, कुमार शिंदे, हुतात्मा साखर कारखाना माजी संचालक भगवान अडिसरे, मारुती माने, हुतात्मा दूध संघाचे संचालक महादेव माने यांनी केले. विरोधी भाजपप्रणित पॅनेलचे नेतृत्व विजय पाटील आणि जिल्हा भाजप उपाध्यक्ष जयवंत मदने यांनी केले. श्रीविष्णू विकास सेवा सोसायटीनंतर नागठाणे विकास सेवा सोसायटीत १३ पैकी १२ जागांवर काँग्रेसचे उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाल्याने नागठाणेच्या विकास सोसायटीत डॉ. पतंगराव कदम गटाने विरोधकांचा धुव्वा उडविला. (वार्ताहर)
नागठाणे सोसायटीत कदम गटाची सत्ता
By admin | Updated: February 27, 2015 23:23 IST