विक्रम पाटील यांच्या पाठीशी सरकारची ताकद : दिलीप कांबळे
By Admin | Updated: February 12, 2015 00:30 IST2015-02-11T23:31:06+5:302015-02-12T00:30:18+5:30
साखर कारखाना, सूतगिरणी यासह अन्य संस्था उभ्या करण्यास सरकार ताकद देईल. विक्रम पाटील म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून ३0 हजार सदस्य नोंदणी पूर्ण करणारच.

विक्रम पाटील यांच्या पाठीशी सरकारची ताकद : दिलीप कांबळे
इस्लामपूर : राज्यातील भाजपप्रणित सरकारकडून सामान्य कार्यकर्त्यांचा बळ देण्याचे धोरण आहे. भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांना संस्थात्मक उभारणीसाठी सरकार सर्वतोपरी ताकद देईल, अशी ग्वाही समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. याचवेळी त्यांनी, भाजपमध्ये सत्ता भोगून बाहेर पडलेल्या अण्णासाहेब डांगे यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर टीका केली.वाळवा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात मंत्री कांबळे यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी येथील एका हॉलमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, इस्लामपूर पालिकेसह विधानसभा मतदारसंघातील निवडणुका पक्षातर्फे ताकदीने लढविण्यात येतील. त्यामुळे भविष्यात विक्रम पाटील यांना आमदार होण्याची संधी मिळेल. भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करावी. ३0 हजार सदस्य नोंदणी पूर्ण झाल्यानंतर विशेष कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही इस्लामपूरला आणू. कांबळे म्हणाले, महायुतीची सुरुवात ज्या इस्लामपूर शहरातून झाली, त्या शहराच्या अन्यायकारक विकास आराखड्यासंदर्भात गोपीनाथ मुंडे यांनी दिलेला शब्द आम्ही सरकारमधील मंडळी पाळणार आहोत. साखर कारखाना, सूतगिरणी यासह अन्य संस्था उभ्या करण्यास सरकार ताकद देईल. विक्रम पाटील म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून ३0 हजार सदस्य नोंदणी पूर्ण करणारच. आतापर्यंत १0 हजार सदस्य नोंदणी झाली असून उर्वरित नोंदणी २५ मार्चपर्यंत पूर्ण करुन पक्षाची ताकद निर्माण करणार आहे.भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांचेही भाषण झाले. आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, योगेश लाड, मकरंद देशपांडे, नगरसेवक विजय कुंभार, भास्कर पाटोळे, मोहन वळसे, रफीक तांबोळी, समीर आगा, सचिन कचरे, माणिक ढोबळे, सिकंदर पटेल, योगेश गोंदकर, संपतराव मोरे उपस्थित होते. (वार्ताहर)