पंतप्रधानांच्या आदेशानंतरही वीज कनेक्शनसाठी फरफट
By Admin | Updated: April 10, 2017 03:38 IST2017-04-10T03:38:33+5:302017-04-10T03:38:33+5:30
महावितरण अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी जवानाच्या पित्याची

पंतप्रधानांच्या आदेशानंतरही वीज कनेक्शनसाठी फरफट
कडेगाव (सांगली) : महावितरण अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी जवानाच्या पित्याची फरफट सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतरही सासवडे येथील सैन्य दलातील जवान अविनाश यांचे वडील विजय पोळ यांची महावितरणच्या मनमानी कारभारामुळे फरफट सुरू आहे.
पोळ यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना तात्काळ वीज कनेक्शन देण्याबाबत पत्र दिले आहे, तरीही त्यांची उपेक्षाच सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या छळास कंटाळून त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. विजय पोळ यांनी २४ नोव्हेंबर २०१६ रोजी महावितरण कंपनीकडे नियमानुसार कोटेशनची रक्कम भरून शेतीसाठी वीज कनेक्शनची मागणी केली. त्यांनी स्वखर्चातून पोल तसेच इतर साहित्यही आणले. परंतु वीज कनेक्शन मिळाले नाही. (प्रतिनिधी)