शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी बँकेतून कर्जाचे आमिष, ९२ लाखांचा गंडा; सांगलीतील दोघांसह आठजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 12:01 IST

दुबईतील बँकेकडून कमी व्याजाने कर्ज मिळविण्यासाठी अहमदाबाद येथील दिनेश देसाई, प्रवीण शहा यांच्या भेटीला नेले. देसाई व शहा यांनी दुबईतील रॅकिया इन्वेस्ट्मेंट ऑथॉरिटीमार्फत २१ कोटी कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

मिरज : परदेशी बँकेकडून २१ कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने मिरजेतील पोल्ट्री व्यावसायिकाची ९२ लाखांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सांगलीतील दोघांसह आठजणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत डाॅ. दत्तात्रय हणमंत दुबे (रा. लोंढे काॅलनी, मिरज) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

योगेश निशिकांत जांभळे, प्रमोद आप्पाजी देशपांडे (रा. विश्रामबाग सांगली), दिनेश देसाई, प्रवीण कुर्डुवार, भारतभूषण परांजपे, प्रवीणचंद्र मणीलाल शहा (सर्व रा. अहमदाबाद), डाॅ. अलशरीफ व महंमद सरावत (रा. दोघे दुबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मिरजेतील डाॅ. दत्तात्रय दुबे यांचा सोलापूर येथे पोल्ट्रीफार्म व डीएचके ऑग्रो फूडस या नावाने व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसाय विस्तारासाठी कर्ज मिळविण्यासाठी सांगलीतील योगेश जांभळे व प्रमोद देशपांडे यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी दुबईतील बँकेकडून कमी व्याजाने कर्ज मिळविण्यासाठी अहमदाबाद येथील दिनेश देसाई, प्रवीण शहा यांच्या भेटीला नेले. देसाई व शहा यांनी दुबईतील रॅकिया इन्वेस्ट्मेंट ऑथॉरिटीमार्फत २१ कोटी कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले.डाॅ. दुबे यांनी स्थानिक बँकेकडून कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून रिझर्व्ह बँकेकडे नोंद करून कर्जाचा प्रस्ताव दुबईतील बँकेचा कायदेविषयक सल्लागार डाॅ. अलशरीफ व महंमद सरावत नामक मध्यस्थांकडे पाठविण्यात आला.

डाॅ. अलशरीफ याने मुद्रांक शुल्क व प्रक्रिया शुल्क म्हणून एक कोटी २५ लाख रुपये डाॅ. दुबे यांना भरायला सांगितले. डाॅ. अलशरीफ याने सांगितलेल्या बँक खात्यावर डाॅ. दुबे यांनी वेळोवेळी ७८ लाख जमा केले. देसाई, शहा व त्यांच्या साथीदारांनी कमिशन म्हणून १४ लाख रुपये घेतले. अलशरीफ याने दुबईतील बँकेकडून २१ कोटी रुपये जमा केल्याची ट्रान्स्फर स्लीप पाठविली. मात्र, ही रक्कम जमा झाली नसल्याने दुबे यांनी संपर्क साधल्यानंतर त्यांना दुबई येथील मध्यस्थांनी आणखी रक्कम भरायला सांगितली.

कर्ज देण्यास टाळाटाळ

कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू झाल्याने त्यांनी जांभळे, देशपांडे, देसाई, कुर्डुवार, परांजपे, शहा, डाॅ. अलशरीफ, महंमद सरावत या आठजणांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली आहे. कर्जाच्या आमिषाने ९२ लाखांच्या फसवणुकीच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी