कोरोनाची संभाव्य तिसरी लाट धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST2021-09-02T04:55:58+5:302021-09-02T04:55:58+5:30

लोकमत न्युज नेटवर्क कसबे डिग्रज : कोरोनाची महामारी अजूनही संपलेली नाही. लोकांनी सावधानता बाळगावी. काेराेनाला राेखण्यासाठी संपूर्ण लसीकरण गरजेचे ...

Potential third wave of corona dangerous | कोरोनाची संभाव्य तिसरी लाट धोकादायक

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट धोकादायक

लोकमत न्युज नेटवर्क

कसबे डिग्रज : कोरोनाची महामारी अजूनही संपलेली नाही. लोकांनी सावधानता बाळगावी. काेराेनाला राेखण्यासाठी संपूर्ण लसीकरण गरजेचे आहे. पण लसीकरण झाले म्हणजे बिनधास्त वागू नये. पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक धोकादायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

कसबे डिग्रज येथिल लोकनेते अजयसिंह चव्हाण प्रवेशद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पाटील म्हणाले, कोरोनामुळे अनेक जिवाभावाची माणसे गमवावी लागली आहेत. त्यांची पोकळी भरून निघणार नाही. गेली कित्येक वर्षे अजयसिंह चव्हाण यांनी गावच्या विकासाची कामे हक्काने करून घेतली. संसारापेक्षा समाज महत्वाचा मानला. त्यामध्ये त्यांचे नुकसान होऊनही ते समाजाचे काम राहिले. सरकारने क्षारपड विकास योजना आखली आहे, क्रीडांगण, शिवसृष्टीची कामे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अजित आपटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब मासुले व व्याख्याते वसंत हंकारे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विविध मान्यवर, नेते, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो : येणार आहे.

ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे आयाेजित कार्यक्रमात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

310821\img-20210829-wa0038.jpg

कसबे डिग्रजच्या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री जयंतराव पाटील

Web Title: Potential third wave of corona dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.