मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीच्या साथीदारांविरुद्ध कारवाईची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST2021-02-05T07:23:45+5:302021-02-05T07:23:45+5:30
मिरजेत चार दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलीवर नदाफ गल्लीतील फरहान ढालाईत नावाच्या तरुणाने मुलीस धमकावून, शिवाजी रस्त्यावर एका खोलीत ...

मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीच्या साथीदारांविरुद्ध कारवाईची शक्यता
मिरजेत चार दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलीवर नदाफ गल्लीतील फरहान ढालाईत नावाच्या तरुणाने मुलीस धमकावून, शिवाजी रस्त्यावर एका खोलीत नेऊन तिला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला हाेता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अटक झालेल्या फरहान यास मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारांवर कारवाईची मागणी महिला कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. फरहान याच्या साथीदारांनी मुलीच्या अपहरणासाठी मदत करून या कृत्याची छायाचित्रेही काढल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी पीडित मुलीच्या तक्रारीनुसार एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चाैकशीत आरोपीच्या मित्रांचाही सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी चाैकशीस पाचारण केल्याने आरोपीच्या दोन मित्रांनी शहरातून पलायन केल्याचीही चर्चा सुरू आहे.