अश्लील चित्रफित; पोलीस निलंबित चौकशी होणार

By Admin | Updated: May 24, 2014 00:42 IST2014-05-24T00:33:17+5:302014-05-24T00:42:19+5:30

सावंत यांची कारवाई

Pornographic; Police will conduct a suspended inquiry | अश्लील चित्रफित; पोलीस निलंबित चौकशी होणार

अश्लील चित्रफित; पोलीस निलंबित चौकशी होणार

 सांगली : विवाहितेची अश्लील चित्रफित बनविल्याचा आरोप असलेला पोलीस कर्मचारी प्रताप बंडू कांबळे (वय ४२) याच्यावर आज जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी निलंबनाची कारवाई केली. तसेच त्याच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. येथील पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी प्रताप कांबळे याने अन्य एका साथीदाराच्या मदतीने विवाहित महिलेची अश्लील चित्रफित बनविल्याची फिर्याद न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. ए. देशमुख यांनी विश्रामबाग पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे कांबळे याच्यावर निलंबनाची टांगती तलवार होती. आज जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी कांबळे याचे निलंबन करण्याचे तसेच त्याची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Pornographic; Police will conduct a suspended inquiry