पोपटराव मोहिते कुंडलापूरचे उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST2021-02-24T04:28:10+5:302021-02-24T04:28:10+5:30
ओळी : कुंडलापूर (ता. कवठेमहंकाळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पोपटराव मोहिते यांची निवड झाली. यावेळी सरपंच पोपटराव गिड्डे (देशमुख) व पॅनलप्रमुख ...

पोपटराव मोहिते कुंडलापूरचे उपसरपंच
ओळी : कुंडलापूर (ता. कवठेमहंकाळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पोपटराव मोहिते यांची निवड झाली. यावेळी सरपंच पोपटराव गिड्डे (देशमुख) व पॅनलप्रमुख महादेव पाटील उपस्थित हाेते.
घाटनांद्रे : कुंडलापूर (ता. कवठेमहंकाळ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे व खासदार संजयकाका पाटील यांचे समर्थक पोपटराव मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
२०१८ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खासदार संजय (काका) पाटील गटाने विरोधी घोरपडे गट व राष्ट्रवादी गटाचा सहाविरुद्ध दोन असा पराभव केला होता. त्यावेळी उपसरपंचपद हे अडीच वर्षासाठी श्रीकांत सोरटे यांना देण्यात आले होते. कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला हाेता. नवीन उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पोपटराव गिड्डे (देशमुख) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. उपसरपंचपदासाठी पोपटराव मोहिते यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच पोपटराव गिड्डे व ग्रामसेवक किशोर माळी यांनी पाेपटराव माेहिते यांची बिनविराेध निवड जाहीर केली.
यावेळी सरपंच पोपटराव गिड्डे, मावळते उपसरपंच श्रीकांत सोरटे, युवा भाजपचे नेते महादेव पाटील यांनी नूतन उपसरपंच पोपटराव मोहिते यांचा सत्कार केला.
यावेळी काळभैरवनाथ बांधकाम कमिटी अध्यक्ष भीमराव माने, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष विजय चव्हाण, तंटामुक्तीचे अध्यक्ष मधुकर पाटील, हिंदुराव जगताप, ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, सुनीता सोरटे, अमृता मोहिते, माणिक बाबर, विशाल सोरटे, गोरख सोरटे, नितीन सोरटे, कैलास पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.