मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावाची दुरवस्था;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST2020-12-05T05:08:52+5:302020-12-05T05:08:52+5:30
गणेश तलावाभोवती नागरिकांना फिरण्यासाठी साडेचारशे मीटर फूटपाथ तयार करण्यात आला आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या वाॅकिंग ट्रॅकवर ...

मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावाची दुरवस्था;
गणेश तलावाभोवती नागरिकांना फिरण्यासाठी साडेचारशे मीटर फूटपाथ तयार करण्यात आला आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या वाॅकिंग ट्रॅकवर परिसरातील नागरिकांनी बंद वाहने उभी केली आहेत. ज्येष्ठ नागरिक व महिला सकाळी ट्रॅकवर चालण्यासाठी येतात. मात्र तलावाभोवती वाहने व बांधकाम साहित्याच्या अडथळ्यामुळे फूटपाथवरून चालणे कठीण बनले आहे. नागरिकांना चालण्यासाठी केलेला वाॅकिंग ट्रॅक वापरासाठी उपलब्ध व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
तलावाच्या सुशोभिकरणासाठी लाखो रुपये खर्च केल्यानंतरही, उपलब्ध केलेल्या सुविधांचा वापर करता येत नसल्याचे चित्र आहे. महापालिका अधिकारी, लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष आहे. तलावाभोवती हातगाडी, फेरीवाल्यांचा गराडा आहे. तलावाच्या परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर आहे. मद्यपींकडून दारूच्या बाटल्याही तलावात टाकण्यात येतात. तलावाशेजारील टांग्यांचे घोडे येथे बांधण्यात येत असल्याने घोड्यांच्या मल-मूत्रामुळे तलावाचे पाणी दूषित होते आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने तलावाचे सुशोभिकरण करून येथे रखवालदार नियुक्त करण्याची नागरिकांची मागणी आहे.
फोटो-०४मिरज ३.४.५.६