एकाचवेळी अनेक घरात ऑनलाईन पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST2021-09-12T04:29:55+5:302021-09-12T04:29:55+5:30

सांगली : ऑनलाईनच्या माध्यमातून एकाचवेळी अनेक घरातील गणरायाचे पूजन करण्याचा अनोखा उपक्रम शुक्रवारी पार पडला. या अनुभवाने सहभागी विद्यार्थी ...

Pooja online in many homes at once | एकाचवेळी अनेक घरात ऑनलाईन पूजा

एकाचवेळी अनेक घरात ऑनलाईन पूजा

सांगली : ऑनलाईनच्या माध्यमातून एकाचवेळी अनेक घरातील गणरायाचे पूजन करण्याचा अनोखा उपक्रम शुक्रवारी पार पडला. या अनुभवाने सहभागी विद्यार्थी व पालक भारावून जात भक्तिरसात न्हाऊन निघाले.

येथील पुरोहित कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा केतकर, उपमुख्याध्यापक सुनील कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रकाश माने यांच्या मार्गदर्शनाने हा ऑनलाइन उपक्रम घेण्यात आला. प्रशालेचे संस्कृत शिक्षक रघुवीर रामदासी यांनी समंत्र शास्त्रोक्त पार्थिव गणेश पूजन विधि लाईव्ह स्वरूपात ऑनलाइन सांगितली. पूजेची माहिती व साहित्य याची पूर्वसूचना विद्यार्थिनींना देऊन पालकांनी त्यांच्या घरात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावी असे याचे स्वरूप होते. त्यानुसार अनेक पालकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन एकाचवेळी सर्वांच्या घरी बाप्पा विराजमान झाले.

या वेळी सर्वांनी मिळून विश्वातील मानव प्रजातीवरील कोरोनाचे संकट दूर होऊन शाळा सुरू व्हाव्यात, अशी गणपतीला प्रार्थना केली. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी ऑनलाइन उपस्थित होते. पुरोहित प्रशालेने केलेल्या पौरोहित्याच्या या अभिनव उपक्रमाबद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला.

Web Title: Pooja online in many homes at once

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.