शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

डाळिंब उत्पादकांची खुलेआम फसवणूक : आटपाडीतील स्थिती -- डाळिंबावर जीएसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:44 IST

कोणत्याही वस्तूची आवक बाजारात वाढली की त्या वस्तूची किंमत घटते आणि आवक कमी झाली की वस्तूची किंमत वाढते, हा अर्थशास्त्राचा तेजी-मंदीचा नियम आटपाडीत अडतदार आणि व्यापाºयांनी खोटा ठरविण्याचा पराक्रम केला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे डाळिंब उत्पादनात कमालीची घट होऊनही ४० ते ६० प्रतिकिलो रुपयांवर दर गेला

ठळक मुद्देअडत्याकडून डमी व्यापारी उभे करून दर पाडण्याचा उद्योग; शेतकऱ्यांमधून नाराजी-

अविनाश बाड ।आटपाडी : कोणत्याही वस्तूची आवक बाजारात वाढली की त्या वस्तूची किंमत घटते आणि आवक कमी झाली की वस्तूची किंमत वाढते, हा अर्थशास्त्राचा तेजी-मंदीचा नियम आटपाडीत अडतदार आणि व्यापाºयांनी खोटा ठरविण्याचा पराक्रम केला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे डाळिंब उत्पादनात कमालीची घट होऊनही ४० ते ६० प्रतिकिलो रुपयांवर दर गेला नाही. बाजार समितीतील अडतदार डमी व्यापारी उभा करून स्वत:च डाळिंब खरेदी करत असल्याने डाळिंबाचे दर वाढत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

यंदा पावसाने वर्षभर पाठ फिरविल्याने तालुक्यात डाळिंबाचे उत्पादन घटले आहे. अनेक शेतकºयांना डाळिंब बागात डाळिंबाचा एकही बहर धरता आलेला नाही. काही शेतकºयांनी थेंब-थेंब पाण्याचा वापर करून मोठ्या कष्टाने डाळिंबाचे उत्पादन काढले आहे. डाळिंब खरेदी करण्यासाठी संपूर्ण देशातून इथे व्यापारी येतात. या व्यापाºयांना तालुक्यातील शेतकºयांच्या बागा दाखविणारे दलाल त्यांच्या कमिशनसाठी शेतकºयांना लुटत आहेत. हे दलालच दर पाडून व्यापाºयांचा फायदा करून देऊन स्वत:च्या तुंबड्या भरत आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीत उघड लिलाव पध्दतीने होणारे डाळिंबाचे सौदे अलीकडे शेतकºयांच्या डोळ्यात धूळफेक करणारे ठरत आहेत. लिलाव उघड करण्याचे फक्त नाटक केले जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.अनेक अडतदार केवळ डमी व्यापारी सौदा करताना उभा करत आहेत. स्वत:च डाळिंब खरेदी करत असल्याने दर पाडत आहेत. त्यामुळे यावर्षी आवक कमी होऊनही दर अजिबात वाढलेला नाही. चुकून बाहेरचा एखादा व्यापारी आलाच तर, त्यादिवशी एकदम दर वाढवून त्याला त्याचदिवशी तोट्यात आणण्याची शाळा इथले अडतदार करीत आहेत. त्यामुळे जवळच्या सांगोला (जि. सोलापूर) येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात व्यापारी खरेदी करत असताना, आटपाडीत मात्र व्यापारी फिरकताना दिसून येत नाहीत. बाजार समितीला गेल्यावर्षी केवळ डाळिंबातून सुमारे ५० लाख कर मिळाला आहे.काही व्यापारी पळून गेल्याने येथील अडतदारांची काही येणेबाकी त्यांच्याकडे अडकली आहे.

याला जबाबदार कोण? याची जबाबदारी बाजार समिती घेते काय? असे प्रश्न अडतदारांकडून उपस्थित केले जात आहेत. हे जरी खरे असले तरी, काही व्यापाºयांनी अडतदारांना गंडवले म्हणून तालुक्यातल्या शेतकºयांना डमी व्यापारी उभा करून अडतदारांनी कायम फसवणे योग्य आहे काय? बाजार समितीने अडतदारांची बैठक घेऊन वारंवार यासाठी सूचना दिल्या आहेत. पण अडतदार एवढे गब्बर आहेत की, ते बाजार समितीच्या पदाधिकाºयांचे म्हणणे ऐकतील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे अडतदारांवर कुणाचाच अंंकुश राहिलेला नाही. याचा फटका येथील उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे.अडतदार मालामाल : शेतकरी कंगालसरकारने अडतमुक्त शेतकरी निर्णय घेतल्याचा शेतकºयांना फायदा झालेला नाही. व्यापाºयांकडून ६ टक्के अडत घेणे, दर पाडल्याने कुचकामी ठरले आहे. बाजार समितीत गेल्या वर्षात ६ लाख १६ हजार २१९ क्रेट भगवा डाळिंबाला किमान १० रुपये ते कमाल ७० रुपये असा सरासरी ४० रुपये दर मिळाला; तर गणेश वाणाची ७९६३ क्रेट विक्री झाली. त्याला फक्त ५ रुपये ते २५ रुपये दर मिळाला. यातून शेतकºयांच्या हाती काही आले नसताना ४९ कोटी २९ लाख ७५ हजार २०० रुपयांची डाळिंबे खरेदीतून केवळ अडतीपोटी अडतदारांना २ कोटी ९५ लाख ७८ हजार ५१२ रुपये मिळाले आहेत.बाजार समितीत शेतकºयांनी डाळिंबे आणल्यानंतर प्रत्येक क्रेटमध्ये हमाली साडेचार रुपये, प्रतवारी करणे साडेचार रुपये आणि वजन (तोलाई) करणे एक रुपया असे एकूण १० रुपये अडतदारांना घेता येतात. शेतकºयांकडून जीएसटीच्या नावाखाली पावतीवर कसलीही नोंद न करता प्रत्येक किलोला एक रुपया घेतला जात आहे. २०१८ या वर्षात इथे ६ लाख १६ हजार २१९ क्रेट भगवा, तर ७ हजार ९६३ क्रेट गणेश डाळिंबाची विक्री झाली आहे. एका क्रेटमध्ये २० किलो डाळिंबे असतात. म्हणजे १ कोटी २४ लाख ८३ हजार ६४० रुपये फक्त जीएसटीच्या नावाखाली घेतले गेले. 

अडतदारांना वारंवार सूचना देत आहोत. शेतकºयांकडून जादा पैशाची आकारणी केलेल्या अडतदारांना दुप्पट दंड आकारून ते पैसे शेतकºयांना दिले आहेत.- भाऊसाहेब गायकवाड, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीडाळिंबाच्या सौद्यात अडतदाराने त्याच्या अडतीत अजिबात खरेदी करू नये, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.- बी. डी. मोहिते, सहायक निबंधक, आटपाडी. 

टॅग्स :Sangliसांगली