प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कवठेएकंद परिसराची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:34+5:302021-02-05T07:25:34+5:30
यादरम्यान विहीर, ओढा, ओहोळ आदी ठिकाणच्या पाण्याचेेे नमुने प्रदूषण विभागाने तपासणीसाठी घेतले आहेत. तक्रारदार शेतकरी विजय बापूसाहेब ...

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कवठेएकंद परिसराची पाहणी
यादरम्यान विहीर, ओढा, ओहोळ आदी ठिकाणच्या पाण्याचेेे नमुने प्रदूषण विभागाने तपासणीसाठी घेतले आहेत.
तक्रारदार शेतकरी विजय बापूसाहेब पैलवान व बापूसाहेब पांडुरंग पैलवान यांनी प्रदूषण विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदन देऊन बेदाणा वाॅशिंग प्रकल्पातील टाकाऊ पाण्यामुळे द्राक्षबागेचे व शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे निवेदन सादर केले होते.
याची दखल ‘लोकमत’ने घेऊन प्रदूषण विभाग गांधारीची भूमिका घेणार का, असा सवाल उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कवठेएकंद येथे जिल्हा प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. परिसरातील शेती, विहीर ओढा अशा पाण्याचे स्रोतांची पाहणी करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. परिसरातील शेती यातील जमिनीची सुपीकता कमी झाली. क्षारपड व खारवट जमीन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चाैकट
अहवाल वरिष्ठांकडे
प्रदूषण नियंत्रण विभागाच्या तासगाव क्षेत्र अधिकारी ए.एस. जगदाळे यांनी पाहणी करून वरिष्ठांकडे अहवाल सादर केला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार वादग्रस्त असणाऱ्या जय शीतला कोल्ड स्टोरेज, बटेजा कोल्ड स्टोरेज व बेदाणा वॉशिंग प्रकल्पाची रीतसर चौकशी व पाहणी करून कारवाई करणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण विभागाच्या क्षेत्र अधिकारी ए.एस. जगदाळे यांनी सांगितले.
फोटो-०२कवठेएकंद१.२.३.४.