विलगीकरण कक्षबाबत वाळवा ग्रामपंचायतीकडून राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST2021-05-22T04:25:17+5:302021-05-22T04:25:17+5:30
वाळवा : वाळवा गावात कोरोनाचे चारशे रुग्ण आहेत. सर्व पक्षीयांच्यावतीने विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे निवेदन ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. ...

विलगीकरण कक्षबाबत वाळवा ग्रामपंचायतीकडून राजकारण
वाळवा : वाळवा गावात कोरोनाचे चारशे रुग्ण आहेत. सर्व पक्षीयांच्यावतीने विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे निवेदन ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. परंतु जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायत यात राजकारण करून जनतेच्या जीविताशी खेळत आहे, असा आरोप राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्याक्ष धनाजी शिंदे व भाजप तालुका कार्यकारिणीचे विक्रम शिंदे यांनी केला.
ते म्हणाले की, कोरोना रुग्णांकरिता विलगीकरण उपयोगी पडणार आहे. १३ मे रोजी अप्पर तहसीलदार यांना भेटून सविस्तर माहिती दिली तसेच या आशयाचे निवेदन दिले. त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये बैठक झाली, पण तुम्ही का आलात विचारले गेले. राष्ट्रवादीचे सदस्य किसन गावडे यांनी आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विनंती केली. परंतु सत्ताधारी सदस्यांऐवजी त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तर दिले की विलगीकरण कक्ष होणार नाही.
विक्रम शिंदे म्हणाले, गेल्यावर्षी २१सप्टेंबरला सुरू केलेल्या विलगीकरण कक्षावेळी लोकवर्गणीतून घेतलेल्या साहित्याची मागणी केली असता मिळणार नाही, असे उत्तर देण्यात आले.