शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसाच्या पत्नीची दोन चिमुरड्यासह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 14:56 IST

Crimenews Sangli : राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीसाच्या पत्नीने तिच्या दोन लहान मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास लेंगरे (ता.खानापूर, जि. सांगली) येथे घडली.  उजिता जोतीराम शिंदे (वय ३०), कु. रिया जोतीराम शिंदे (वय ६) व चि. केदारनाथ जोतीराम शिंदे (वय १, सर्व रा. लेंगरे, पाटीलवस्ती) अशी जीवनयात्रा संपविलेल्या माय-लेकरांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी या घटनेला कौटुंबिक वादाची झालर असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती.

ठळक मुद्देपोलीसाच्या पत्नीची दोन चिमुरड्यासह आत्महत्यालेंगरे येथील घटना : विहीरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्रा

विटा (सांगली) : राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीसाच्या पत्नीने तिच्या दोन लहान मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास लेंगरे (ता.खानापूर, जि. सांगली) येथे घडली.  उजिता जोतीराम शिंदे (वय ३०), कु. रिया जोतीराम शिंदे (वय ६) व चि. केदारनाथ जोतीराम शिंदे (वय १, सर्व रा. लेंगरे, पाटीलवस्ती) अशी जीवनयात्रा संपविलेल्या माय-लेकरांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी या घटनेला कौटुंबिक वादाची झालर असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती.लेंगरे येथील जोतीराम शिंदे हे अमरावती येथे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंब लेंगरे येथील भूड रस्त्यावरील पाटीलवस्ती येथे वास्तव्यास आहे. शिंदे यांचा गेल्या सात ते आठ वर्षापूर्वी कलेढोण येथील उजिता यांच्याशी विवाह झाला होता. गेल्या वर्षभरापासून विवाहिता या प्रसुतीसाठी माहेरी कलढोण येथे गेल्या होत्या.गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्या सहा वर्षाची मुलगी रिया, एक वर्षाचा मुलगा केदारनाथ यांच्यासह सासरी लेंगरे येथे राहण्यास आल्या होत्या. त्यांचे पती जोतीराम हे सुध्दा दि. १ मे रोजी सुट्टी घेऊन गावी लेंगरे येथे आले होते. त्यामुळे घरी विवाहिता उजिता, मुलगी रिया, मुलगा केदारनाथ, पती व सासू-सासरे असे वास्तव्यास होते.

शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक विवाहिता उजिता या दोन लहान मुलांना घेऊन घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी लेंगरे येथील पाटीलवस्तीवरील दुर्योधन शिंदे यांच्या मालकीच्या शेतातील विहीरीत मुलगी रिया, चिमुरडा केदारनाथ या दोघांसह स्वत: विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ आली नसल्याने पतीसह तेथील स्थानिक लोकांनी विहीरीत शोध घेतला असता उजिता यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.

रात्री काळोख असल्याने रिया व केदारनाथ या चिमुरड्यांच्या शोधकार्यात अडथळा आला. त्यामुळे शनिवारी सकाळी आठ वाजता विटा पोलीसांच्या मदतीने दोन मुलांचे मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक अकुंश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, बीट हवालदार अमोल पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची वर्दी पोलीस पाटील पुष्पा बोबडे यांनी विटा पोलीसांत दिली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आपल्या दोन चिमुरड्या मुलांसह विवाहिता उजिता शिंदे यांनी केलेल्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, या घटनेला कौटुंबिक वादाची झालर असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती. विटा ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर या माय-लेकांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस निरीक्षक संतोष डोके पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीPoliceपोलिस