पोलिसांच्या सुट्ट्या, रजांवर गदा..!

By Admin | Updated: August 31, 2014 00:15 IST2014-08-31T00:11:59+5:302014-08-31T00:15:13+5:30

दोन महिने बंदोबस्त : उत्सवांपाठोपाठ निवडणूक

Police Vacations, Mace on Raje ..! | पोलिसांच्या सुट्ट्या, रजांवर गदा..!

पोलिसांच्या सुट्ट्या, रजांवर गदा..!

सचिन लाड / सांगली
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या दोन सणांपाठोपाठ विधानसभा निवडणूक येणार असल्याने जिल्ह्यातील पोलिसांना आता दोन महिने अविश्रांत बंदोबस्तावर थांबावे लागणार आहे. गृहखात्याने त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या व रजाही बंद केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या शारीरिक क्षमतेची कसोटीच जणू पाहिली जाणार आहे. बंदोबस्तामुळे पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाजासह तपासावर परिणाम होणार आहे.
सध्या गणेशोत्सव सुरू आहे. हा उत्सव शांततेत पार पाडण्याची जबाबदारी पोलिसांवरच असते. सकाळी नऊपासूृन रात्री दोनपर्यंत कडक पहारा ठेवावा लागत आहे. या दहा दिवसांनंतर नवरात्रोत्सव आहे. सांगलीत पहाटे दुर्गामाता दौड निघते, तर रात्री उशिरापर्यंत दांडियाचा खेळ सुरू असतो. या कालावधितही त्यांना रात्रंदिवस बंदोबस्त ठेवावा लागतो. या दोन उत्सवांतून पोलीस बाहेर पडतात, तोपर्यंत दिवाळी आणि विधानसभेची निवडणूक येत आहे. गणेशोत्सवापासून सुरू झालेला हा बंदोबस्त दोन महिने म्हणजे निवडणूक संपेपर्यंत राहणार आहे.

Web Title: Police Vacations, Mace on Raje ..!