पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:56+5:302021-09-02T04:56:56+5:30
ओळी : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) बनातील कार्यक्रमात पालकमंत्री जयंत पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन पोलीस पाटील संघटनेने दिले. यावेळी ...

पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करावी
ओळी : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) बनातील कार्यक्रमात पालकमंत्री जयंत पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन पोलीस पाटील संघटनेने दिले. यावेळी तालुकाध्यक्ष गोरख चव्हाण, सचिव महादेव शिंदे, मनोज जाधव, कृष्णा चोरमुले, शशिकांत अस्वले, नामदेव भुसनूर आदी उपस्थित आहेत.
ढालगाव : पोलीस पाटलांचे दरमहा मानधन पंधरा हजार रुपये करावे, पोलीस पाटलांचे नूतनीकरण कायमचे बंद करावे, कोरोना काळामध्ये मृत झालेल्या पोलीस पाटील यांच्या वारसांची अनुकंपाखाली नेमणूक करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री जयंत पाटील यांना कवठेमहांकाळ तालुका पोलीस पाटील संघटनेने दिले.
आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बनातील कार्यक्रमात निवेदन दिले. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील यांची उपस्थिती होती. शासन स्तरावर पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा होऊन त्यावर निर्णय व्हावा, पोलीस पाटील यांची वयोमर्यादा ६५ करावी, अतिरिक्त गावचा पदभार सांभाळणाऱ्या पोलीस पाटील यांना अतिरिक्त मोबदला मिळावा, एखाद्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल झाल्यास कोर्टाचा निकाल लागेपर्यंत निलंबन करण्यात येऊ नये यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे केल्या.
जयंत पाटील यांनी संघटनेला सकारात्मक आश्वासन दिले. संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख चव्हाण, उपाध्यक्ष कृष्णा चोरमुले, अलका सुतार, सचिव महादेव शिंदे, दीपक पाटील, मनोज जाधव, नामदेव भुसनूर, शशिकांत अस्वले, सुवर्णा पाटील यांच्यासह पोलीस पाटील उपस्थित होते.