शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: भाजीपाला पिकात गांजा पिकवला, पोलिसांनी छापा मारून १३ लाखांचा माल जप्त केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:32 IST

साळमळगेवाडीत कारवाई : जत पोलिसांकडून एकास अटक

जत : साळमळगेवाडी (ता. जत) येथे भाजीपाला पिकात लागवड केलेला १३० किलो गांजा जत पोलिसांनी छापा मारून जप्त केला. गांजाची किंमत सुमारे १३ लाख रुपये आहे. याप्रकरणी संजय प्रभाकर गिरीबुवा (वय ४७, रा. साळमळगेवाडी) याला अटक केली आहे.जत पोलिस ठाण्यापासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या साळमळगेवाडी येथे संजय गिरीबुवा याने त्याच्या शेतात भाजीपाला पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जत पोलिसांनी पंचांना घेऊन साळमळगेवाडी गाव गाठले. तेथे तारांचे मंडप बांधलेले होते. भाजीपाला पिकात संजय गिरीबुवा हा मशागत करत होता.

पोलिसांनी तपासणी केल्यानंतर मिर्ची, घेवडा, वांगी, भेंडी या पिकांमध्ये ठिकठिकाणी गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. पोलिसांनी पिकाची तपासणी करून सहा ते आठ फूट उंचीची १८ झाडे जप्त केली. जप्त केलेला गांजा पोत्यात भरून वजन केले तेव्हा १३० किलो वजन भरले. त्याची किंमत दहा हजार रुपयांप्रमाणे १३ लाख रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले.गिरीबुवा याला गांजाची लागवड केल्याप्रकरणी अटक केली. त्याच्याविरूद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात याची चर्चा रंगली होती.

बालगावला हत्ती गवतात गांजा जत पोलिसांबरोबर उमदी पोलिसांनी बालगाव येथे भीमराया सिद्धराय हेगड्याळ याच्या शेतात छापा मारला. त्याने हत्ती गवतामध्ये गांजाची लागवड केलेली होती. पोलिसांनी ६६ हजार रुपयांचा गांजा पंचनामा करून जप्त केला. हेगड्याळ याच्याविरुद्ध पोलिस कर्मचारी लक्ष्मण बंडगर यांनी फिर्याद दिली आहे.

जत तालुका गांजाचे केंद्रजत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजा उत्पादन केला जात असल्याचे पोलिस कारवाईवरून दिसून आले. जत आणि उमदी पोलिसांनी दोन छाप्यांत पावणे चौदा लाख रुपयांचा गांजा जप्त केला.