कासेगाव येथे जिल्हासीमेवर पोलिसांचा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:26 IST2021-05-10T04:26:17+5:302021-05-10T04:26:17+5:30
प्रताप बडेकर लोकमत न्यूज नेटवर्क कासेगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली-सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कासेगाव ...

कासेगाव येथे जिल्हासीमेवर पोलिसांचा पहारा
प्रताप बडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
कासेगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली-सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कासेगाव (ता. वाळवा) पोलिसांचा २४ तास खडा पहारा सुरू आहे. या ठिकाणी चेकपोस्ट उभारले असून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचारी आपले काम चोखपणे पार पाडत आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने राज्य सरकारने सर्वत्र कडकडीत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली-सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर कासेगाव येथे कासेगाव पोलिसांचा २४ तास खडा पहारा सुरू आहे. या महामार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची व त्यांच्या कागदपत्रांची कसून तपासणी कासेगाव पोलिसांकडून केली जात आहे. सांगली-सातारा जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी व तपासणी करूनच ते वाहन पुढे सोडण्यात येत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनीही या चेकपोस्टला भेट देऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत.