आष्ट्यात पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:55+5:302021-03-30T04:16:55+5:30
आष्टा पोलिसांनी पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध मार्गांवरून पथसंचलन केले. लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : येथे ...

आष्ट्यात पोलिसांचे पथसंचलन
आष्टा पोलिसांनी पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध मार्गांवरून पथसंचलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथे वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आष्टा पोलिसांनी शहरातील विविध मार्गांवरून पथसंचलन केले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी संचारबंदी जाहीर केल्यानंतर पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक यू. जी. देसाई, दीपक सदामते, संजय सनदी, अवधूत भाट यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, पोलीस मित्र यांनी शहरातील बाळासाहेब ठाकरे चौक, सहकार महर्षी एन. ए. रुकडे प्रवेशद्वार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दत्त मंदिर चौक, शिवाजी चौक या मार्गांवरून जनजागृती केली.
पोलीस निरीक्षक अजित सिद म्हणाले, राज्यात व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. मास्कचा वापर करावा. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.