पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

By Admin | Updated: May 28, 2014 00:49 IST2014-05-28T00:49:02+5:302014-05-28T00:49:10+5:30

कार्यकाल पूर्ण : पाच अधिकारी रुजू

Police officers transfers outside the district | पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

सांगली : कार्यकाल पूर्ण झाल्याने तीन पोलीस अधिकार्‍यांच्या आज (मंगळवार) जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या. यामध्ये पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, इंद्रजित काटकर, फुलचंद चव्हाण यांचा समावेश आहे. पाच नवीन अधिकारी येथे बदली होऊन आले आहेत. कुरुंदकर यांची गुप्तवार्ता विभागातून ठाणे ग्रामीणला बदली झाली. काटकर यांची आर्थिक गुन्हे शाखेतून रत्नागिरीला बदली झाली आहे. चव्हाण हे चार महिन्यांपूर्वी कोल्हापूरहून सांगलीला बदली होऊन आले होते. ते वाचक शाखेत नियुक्तीस आहेत. त्यांची सोलापूरला पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. जिल्ह्यात नवीन बदली होऊन आलेले अधिकारी पुढीलप्रमाणे, कंसात सध्याचे ठिकाण : अशोक भवड (मरोळ, मुंबई), सदाशिव शेलार (पुणे), बाजीराव पाटील (रत्नागिरी), प्रकाश कदम (पोलीस प्रशिक्षण खंडाळा), युवराज मोहिते (नागपूर). यातील पाटील यांची सांगलीत सेवा झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police officers transfers outside the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.