कवलापुरात पोलिसांचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:20 IST2021-01-10T04:20:03+5:302021-01-10T04:20:03+5:30
कवलापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका वॉर्डाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १४ जागांसाठी दोन पॅनेलच्या माध्यमातून २८ जण निवडणूक ...

कवलापुरात पोलिसांचे संचलन
कवलापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका वॉर्डाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १४ जागांसाठी दोन पॅनेलच्या माध्यमातून २८ जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एकास एक उमेदवार असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग सतर्क झाला आहे. पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरुन फिरुन पोलिसांनी संचलन केले. प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, पोलीस निरीक्षक सागर पाटील, किरण मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल निकम यांच्यासह ६० पोलीस या संचलनात सहभागी झाले होते.
संचलनानंतर ग्रामपंचायत समोरील पटांगणावर टिके यांनी या निवडणुकीतील भाजपाप्रणीत श्री सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनेलचे नेते निवासबापू पाटील आणि महाविकास आघाडीप्रणीत श्री सिद्धेश्वर ग्राम महाविकास आघाडीच्या पॅनेलचे नेते भानुदास पाटील यांना ही निवडणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. तसेच काही सूचनाही केल्या.