पोलीस निरीक्षकासह हवालदार निलंबित

By Admin | Updated: May 27, 2014 01:21 IST2014-05-27T01:12:42+5:302014-05-27T01:21:20+5:30

लाच प्रकरण : महानिरीक्षकांची कारवाई

The police inspector suspended the constables | पोलीस निरीक्षकासह हवालदार निलंबित

पोलीस निरीक्षकासह हवालदार निलंबित

सांगली : बनावट खत प्रकरणात जप्त करण्यात आलेला ट्रक परत देण्यासाठी लाख रुपयांची लाच घेऊन आणखी २५ हजाराची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटकेची कारवाई केलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम व हवालदार दीपक सदामते यांना निलंबित करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी ही कारवाई केली. खटाव (ता. पलूस) येथील लक्ष्मण मडीवाळ यांचा मुलगा महंतेश यास तीन महिन्यापूर्वी ट्रकमधून बनावट खत घेऊन जाताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. या प्रकरणात ट्रक जप्त करण्यात आला होता. हा ट्रक सोडविण्यासाठी मडीवाळ गेले होते. त्यावेळी कदम यांनी दीड लाखाची लाच मागितली होती. मडीवाळ यांनी एक लाख रुपये दिले होते. त्यानंतर कदम यांनी २५ हजारासाठी मडीवाळ यांच्याकडे तगादा लावला होता. मडीवाळ यांनी २५ हजार रुपये कधी व कोणाकडे देऊ, अशी मोबाईलवरून विचारणा केली. त्यावेळी कदम यांनी २५ हजार रुपये हवालदार दीपक सदामते यांच्याकडे देण्यास सांगितले. लाच मागण्याबाबत मोबाईलवर झालेल्या संभाषणावरुन कदम व सदामते यांना अटक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)

Web Title: The police inspector suspended the constables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.