शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

ATM कार्डद्वारे फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, एलसीबीची कारवाई 

By शरद जाधव | Updated: October 11, 2022 19:15 IST

ATM कार्डद्वारे फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. 

सांगली : जिल्ह्यातील अनेक भागांत बँक एटीएम कार्डची आदलाबदल करून त्याद्वारे पैशावर डल्ला मारणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केले. संभाजी गोविंद जाधव (वय ३७, रा. चंद्रसेननगर, विटा) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून विविध कंपन्यांची तब्बल १०१ एटीएम कार्डसह तीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यात एटीएम कार्डवर पैसे काढताना फसवणुकीचे प्रकार वाढले होते. याचा तपास करून आरोपींवर कारवाईसाठी एलसीबीने खास पथक तयार केले होते. पथक गस्तीवर असताना, संशयित जाधव हा तासगाव रोडवरून सांगलीकडे येत असल्याची माहिती मिळाली. माधवनगरजवळ त्याला सापळा लावून थांबवत चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयित जाधव हा एटीएम केंद्रात जाऊन पैसे काढून देतो म्हणून नागरिकांची कार्ड घेत असे व हातचलाखीने त्याची आदलाबदल करून तो कार्ड आपल्याकडे घ्यायचा. त्यानंतर त्या कार्डवरून तो पैसे काढून घेत असे किंवा पेट्रोलपंपावर त्याचा वापर करत असे. अशी काढलेली तीन लाखांची रोकड यावेळी त्याच्याजवळ सापडली. जाधव याने तासगाव, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, जयसिंगपूर, शिवाजीनगर व म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे गुन्हे केल्याची कबुली दिली.

एटीएम कार्डचा ढीगएलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास पवार, बिरोबा नरळे, जितेंद्र जाधव, संदीप पाटील, सागर लवटे, विक्रम खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता एका पिशवीत वेगवेगळ्या बॅकांची १०१ एटीएम कार्ड त्याच्याजवळ सापडली. यासह गुन्ह्यात वापरत असलेली ५० हजार रुपये किमतीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

आणखी गुन्हे उघडकीस येणारसंशयित जाधव याच्याकडून आतापर्यंत सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत. केवळ एटीएमद्वारे फसवणूकच नव्हे तर मोटारसायकलची चोरी व घरफोडीचेही गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसatmएटीएमArrestअटक