पोलिसाची कॉलर पकडणाऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:29 IST2021-08-13T04:29:49+5:302021-08-13T04:29:49+5:30
सांगली : शहरातील टिंबर एरिया येथील भीमनगर येथे दंगा करत असलेल्या तरुणांना रोखणाऱ्या पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पोलिसाची ...

पोलिसाची कॉलर पकडणाऱ्यांवर गुन्हा दाखल
सांगली : शहरातील टिंबर एरिया येथील भीमनगर येथे दंगा करत असलेल्या तरुणांना रोखणाऱ्या पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पोलिसाची कॉलर पकडून त्याला खाली पाडून मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन शिवाजी पवार यांनी रमेश शिवाजी कट्टीमणी व शिवाजी कल्लाप्पा कट्टीमणी (दोघेही रा. भीमनगर, सांगली) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
पाेलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवार, दि. १० राेजी रात्री ११ च्या सुमारास पोलीस कर्मचारी पवार व बंडगर हे रात्री गस्तीवर असताना, भीमनगर येथील स्वास्तिक काटा येथे दंगा चालू होता. यावेळी दोघांनी तिथे जात संशयितांना शांतता राखण्यास सांगितले. यावेळी पिता-पुत्रांनी अडथळा आणत पोलीस कर्मचारी पवार यांंची कॉलर पकडून त्यांना खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.