इस्लामपुरात ठेकेदारास लुटणाऱ्यास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:20 IST2021-02-20T05:20:31+5:302021-02-20T05:20:31+5:30

इस्लामपूर : इस्लामपूर-पेठ रस्त्यावरील विश्रामगृहासमोर चहाच्या टपरीजवळ थांबलेल्या ठेकेदाराच्या गळ्याला चाकू लावून दिवसाढवळ्या लुटणाऱ्या संशयितास येथील न्यायालयाने २२ ...

Police custody for robbing a contractor in Islampur | इस्लामपुरात ठेकेदारास लुटणाऱ्यास पोलीस कोठडी

इस्लामपुरात ठेकेदारास लुटणाऱ्यास पोलीस कोठडी

इस्लामपूर : इस्लामपूर-पेठ रस्त्यावरील विश्रामगृहासमोर चहाच्या टपरीजवळ थांबलेल्या ठेकेदाराच्या गळ्याला चाकू लावून दिवसाढवळ्या लुटणाऱ्या संशयितास येथील न्यायालयाने २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. १७ हजारांची रोकड घेऊन पळून गेलेला त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार आहे.

बबन भगवान वाघमोडे (वय २५, रा. शिवनगर, इस्लामपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार युनूस जमीरअहमद खान (रा. श्रीपादनगर, इस्लामपूर) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. खान येथील उद्योगांना मजूर पुरविण्याच्या ठेकेदारीचे काम करतो. गुरुवारी दुपारी खान पेठ रस्त्यावरील पानटपरीजवळ थांबला होता. त्यावेळी वाघमोडे आणि त्याच्या साथीदाराने खानकडून सिगारेट घेण्याचा बहाणा केला. वाघमोडे याने खान याच्या गळ्याला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देत त्याच्याशी झटापट केली. या झटापटीत वाघमोडे याने खान याच्या खिशातील १७ हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेत ती साथीदाराकडे दिली. खान याने आरडाओरडा केल्यानंतर रोकड घेतलेला साथीदार पळून गेला. परिसरातील नागरिकांनी वाघमोडे याला पकडून ठेवण्यात यश मिळविले. फरारी असलेल्या साथीदाराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शेडगे अधिक तपास करीत आहेत.

फोटो- १९०२२०२१-आयएसएलएम-बबन वाघमोडे (सिंगल)

Web Title: Police custody for robbing a contractor in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.