जिल्ह्यात ११ ठिकाणी पोलिसांचे तपासणी नाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:46+5:302021-04-23T04:29:46+5:30

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने गुरुवारी रात्री आठपासून अजून कडक केलेल्या निर्बंधांची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन ...

Police checkpoints at 11 places in the district | जिल्ह्यात ११ ठिकाणी पोलिसांचे तपासणी नाके

जिल्ह्यात ११ ठिकाणी पोलिसांचे तपासणी नाके

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने गुरुवारी रात्री आठपासून अजून कडक केलेल्या निर्बंधांची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन निर्बंधांनुसार जिल्हाबंदी करण्यात आली असून, परजिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी जिल्ह्यांच्या सर्व ११ ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

शासनाने गुरुवारी रात्री आठपासून निर्बंध अधिक कडक करताना आता जिल्हाबंदी आदेश दिले आहेत.

जिल्हाबंदी लागू करतानाच परजिल्ह्यांतून खासगी बसने येणाऱ्या प्रवाशांच्या हातावरही क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येणार आहे. आज, शुक्रवारी सकाळपासून यासाठी यंत्रणा कार्यन्वित होणार आहे.

अत्यावश्यक कारणांशिवाय जिल्ह्यातून बाहेर जाण्यास व येण्यासही पूर्ण बंदी असणार आहे. या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा व राज्य अशा ११ सीमांवर चेकनाके कार्यरत असतील. या ठिकाणी एक पोलीस अधिकारी व चार पोलीस कर्मचारी असे २४ तास पथक असणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच, त्याची नोंद घेऊनच सोडले जाणार आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय इतर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. नागरिकांनीही पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक गेडाम यांनी केले आहे.

Web Title: Police checkpoints at 11 places in the district