मिरजेत पालिकेच्या मुकादमास मारहाण

By Admin | Updated: August 28, 2014 23:05 IST2014-08-28T22:41:56+5:302014-08-28T23:05:01+5:30

बोगस नियुक्तीपत्र : कर्मचारी आक्रमक

The police beat the municipality | मिरजेत पालिकेच्या मुकादमास मारहाण

मिरजेत पालिकेच्या मुकादमास मारहाण


मिरज : मिरजेत प्रभाग चारमधील सफाई कामगारांच्या बोगस नियुक्ती प्रकरणाची वाच्यता केल्याच्या संशयावरून एका मुकादमास मारहाण करण्यात आली. बोगस नियुक्तीपत्रे देणाऱ्या मुकादमाने तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे.
मिरजेतील प्रभाग चारमध्ये महापालिका कामगार अधिकाऱ्यांच्या बोगस सहीने मानधनावरील सफाई कामगारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. बोगस नियुक्ती केलेल्या ३० कामगारांचे पगाराच्या वाटणीवरून मुकादम व स्वच्छता निरीक्षकांचा वाद झाल्याची चर्चा आहे. बोगस नियुक्ती झालेल्या काही कामगारांचा पगार निघाला नसल्याने याबाबत तक्रारी झाल्या, मात्र महापालिका अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबून ठेवले आहे. बोगस नियुक्तीपत्राच्या प्रकरणाची वाच्यता केल्याच्या संशयावरून राजू नावाच्या मुकादमाने बाबू या मुकादमाला मारहाण केल्याने बोगस नियुक्तीवरून कामगारांत मारामाऱ्या सुरू झाल्या आहेत. पगार न मिळाल्याने तक्रार करणाऱ्या कामगारांना राजू या मुकादमाने खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे.
कामगारांची फसवणूक प्रकरणात स्वच्छता निरीक्षकासह अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याने बोगस नियुक्तीप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यास टाळाटाळ सुरू असल्याचे चित्र आहे. कामगारांची फसवणूक प्रकरणावरून आता हाणामाऱ्यांमुळे संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणी प्रशासनाने मौन पाळले आहे. (वार्ताहर)

Web Title: The police beat the municipality