जतच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला पोलीस प्रशासनाचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST2021-09-03T04:26:58+5:302021-09-03T04:26:58+5:30

जत : जत येथील संस्थानकालीन चिरेबंदी दगडी इमारत भुईसपाट करून त्या जागेवर नवीन सर्व सोयींनीयुक्त प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी शासनाने ...

Police administration obstructs construction of Jat's administrative building | जतच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला पोलीस प्रशासनाचा अडथळा

जतच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला पोलीस प्रशासनाचा अडथळा

जत : जत येथील संस्थानकालीन चिरेबंदी दगडी इमारत भुईसपाट करून त्या जागेवर नवीन सर्व सोयींनीयुक्त प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी शासनाने बारा कोटी रूपये खर्चाला मान्यता दिली आहे. पोलीस स्थानकाच्या शस्त्रागाराची खोली पाडताना पोलीस प्रशासनाने ठेकेदाराला थांबवले आहे.

संस्थानकालीन इमारतीच्या जागेवर नवीन इमारत बांधकाम करण्याचे काम मिरज येथील मेहरकर कन्स्ट्रक्शनला मिळाले आहे. ही इमारत दोन वर्षांच्या आत पूर्ण करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून, ठेकेदाराने नवीन प्रशासकिय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यासाठी जुनी शंभर वर्षांपूर्वीची संस्थानकालीन इमारत भुईसपाट करण्याचे काम सुरू केले आहे. निम्म्याहून अधिक इमारत पाडण्याचे काम झाले आहे. जत पोलीस स्थानकाच्या बाजूला कैदी ठेवतात, त्याठिकाणी व पोलीस स्थानकाच्या शस्त्रागाराची खोली पाडताना पोलीस प्रशासनाने ठेकेदाराला थांबवले आहे.

जत पोलीस स्थानकाला सध्या कैदी ठेवण्यासाठी बराक नाहीत. पोलीस स्थानकाकडे शस्त्रागाराचीही व्यवस्था नाही. त्यामुळे येथील कैद्यांची व्यवस्था व शस्त्रागाराची व्यवस्था करण्याची समस्या पोलीस प्रशासनापुढे आहे. त्यामुळे त्यांनी हे काम थांबवले आहे.

पोलीस प्रशासन म्हणते की, ठेकेदार मेहरकर यांनी पोलीस स्थानकाच्या शस्त्रागारासाठी तात्पुरती व्यवस्था करून द्यावी. या दोघांच्या वादात प्रशासकीय इमारतीच्या बांधकामात अडथळा आला आहे. या वादामुळे जतकरांचे प्रशासकीय इमारतीचे स्वप्न कसे पूर्ण होणार? ठेकेदार प्रशासकीय इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

020921\162-img-20210902-wa0019.jpg

जत येथिल प्रशासकिय इमारतीच्या बांधकामाला जत पोलीस प्रशासनाचा अडथळा.जेलमधील कैदी व शस्त्रागाराची व्यवस्था लावण्याचे पोलीस प्रशासनासमोर आव्हान.

Web Title: Police administration obstructs construction of Jat's administrative building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.