आष्ट्यात 'हॉटेल सरपंच', 'रॉयल'वर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST2021-04-09T04:28:40+5:302021-04-09T04:28:40+5:30

आष्टा : जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आष्टा येथील हॉटेल सरपंच व हॉटेल रॉयल या दोन हॉटेल चालकावर ...

Police action against 'Hotel Sarpanch' and 'Royal' in Ashta | आष्ट्यात 'हॉटेल सरपंच', 'रॉयल'वर पोलिसांची कारवाई

आष्ट्यात 'हॉटेल सरपंच', 'रॉयल'वर पोलिसांची कारवाई

आष्टा :

जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आष्टा येथील हॉटेल सरपंच व हॉटेल रॉयल या दोन हॉटेल चालकावर आष्टा पोलिसांनी कारवाई केली.

आष्टा पोलीस पेट्रोलिंग करीत असताना रात्री ९ च्या दरम्यान आष्टा ते तासगाव मार्गावरील हॉटेल सरपंच हे सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत हॉटेलचे मालक अमोल आनंदराव चौगुले यांच्यावर कारवाई केली. आष्टा येथील रुकडे पेट्रोल पंपासमोरील हॉटेल रॉयल हे रात्री ९.३० वाजता सुरू होते. हॉटेलचे मालक महेश दत्तात्रय चव्हाण यांच्यावरही आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत पोलीस निरीक्षक अजित सिद, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस.जे. देशिंगे, संजय सनदी, समद मुजावर यांनी कारवाई केली. आष्टा शहर व परिसरातील सर्व नागरिक, व्यापारी यांनी जमावबंदी, संचारबंदी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन अजित सिद यांनी केले आहे.

Web Title: Police action against 'Hotel Sarpanch' and 'Royal' in Ashta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.