विषारी मांगुर माशांची कापरी, कार्वेत विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:28 IST2021-05-07T04:28:54+5:302021-05-07T04:28:54+5:30

दरम्यान, गुरुवारी विषारी मांगुर जातीच्या माशांबद्दल ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच हे मासे खाणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ...

Poisonous Mangur fish capri, sold in Carve | विषारी मांगुर माशांची कापरी, कार्वेत विक्री

विषारी मांगुर माशांची कापरी, कार्वेत विक्री

दरम्यान, गुरुवारी विषारी मांगुर जातीच्या माशांबद्दल ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच हे मासे खाणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. असे मासे विकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

काही शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासाठी मत्स्यबीज आणले होते. मात्र व्यापाऱ्यांनी फसवून त्यांना मांगूर जातीच्या माशांचे बीज दिले होते. बीज लहान असल्यामुळे शेतकऱ्यांना माशांच्या जातीची शहानिशा करता आली नाही. दरम्यान, हे बीज मोठे झाल्यानंतर हे मासे विषारी मांगुर जातीचे असल्याचे लक्षात आल्यानंतर, या शेतकऱ्यांनी मासे पकडले नाहीत. मात्र या धरणातील पाणी कमी झाल्यानंतर इतर अनेकांनी हे मासे पकडून नेण्यास सुरुवात केली. त्यातील काही लोकांनी हे मासे पकडून कापरी व कार्वे येथे शंभर ते दीडशे रुपये किलोने विक्री करण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान संबंधित मासे मांगुर जातीचे असून ते विक्रीस बंदी आहे, तसेच ते विषारी असल्याचे समजल्यानंतर मासे खाणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कोट

मांगुर जातीचे मासे विक्रीस बंदी असून ते विषारी असल्याचे समजल्यामुळे तातडीने विक्री न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित विभागाने हे मासे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत.

- विठ्ठल गडकरी, माजी सरपंच, कार्वे

Web Title: Poisonous Mangur fish capri, sold in Carve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.