लिंब येथे एकास विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:27 IST2021-03-05T04:27:07+5:302021-03-05T04:27:07+5:30

सांगली : तासगाव तालुक्यातील लिंब येथील एकास विषबाधा झाली. सुखदेव खंडू साठे (वय ३७) असे त्यांचे नाव असून गुरुवारी ...

Poisoning of one at Limb | लिंब येथे एकास विषबाधा

लिंब येथे एकास विषबाधा

सांगली : तासगाव तालुक्यातील लिंब येथील एकास विषबाधा झाली. सुखदेव खंडू साठे (वय ३७) असे त्यांचे नाव असून गुरुवारी दुपारी ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

वाळवा येथील तरुणास मारहाण

सांगली : वाळवा येथील तरुणास मारहाण करण्यात आली. यात मंगेश अशोक कदम (वय २६) हा जखमी झाला. गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

जत येथे तरुणास मारहाण

सांगली : जत येथील तरुणास मारहाण झाली. रमेश अर्जुन बंडगर (वय २०) असे जखमीचे नाव असून बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

सांगलीतून दुचाकी लंपास

सांगली : शहरातील तरुण भारत क्रीडांगणाजवळून चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. याप्रकरणी यशवंत लक्ष्मण कुलकर्णी (रा. आनंदवन कॉलनी, विश्रामबाग, सांगली) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

--

फौजदार गल्लीतून मोटार लंपास

सांगली : शहरातील खणभाग परिसरातील फौजदार गल्लीतून चारचाकी वाहन चोरट्यांनी लांबविले. याप्रकरणी नसीर अब्दुलगणी पठाण यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. घरासमोर लावलेली मोटार चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Poisoning of one at Limb